नवीन नाशिक । Nashik

देशासाठी त्याग करणारे अनेक महान नेते, क्रांतिकारक होऊन गेलेत अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आजही देश संरक्षणासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता सर्व गोष्टींचा त्याग करीत सैनिक पहारा देत असतात.

देश प्रेम मनामनात भरलेल्या अनेक व्यक्ती, नेते आपल्याला दिसतात लग्न समारंभामध्ये आपल्या घरातील दिवंगत व्यक्तीं च्या प्रतिमांना स्मरण करून विवाहाला सुरुवात केली जाते. परंतु या गोष्टींना फाटा देत देशप्रेम मनात भरलेल्या ठाकूर व विसे कुटुंबियांच्या पाथर्डी फाटा येथील लग्नप्रसंगी दिसून आले.

वधू-वरांनी मंडपात प्रवेश केला गजबजलेल्या वऱ्हाडीमधून वाट काढत ते स्टेज जवळ आले. या ठिकाणी सर्व प्रथम भारत मातेचे पूजन करण्यात येऊन देशासाठी प्राण पणाने लढलेल्या व आहुती दिलेल्या वीर जवानांचे स्मरण करण्यात येऊन बंदुकीचे, साहित्याचे पूजन करण्यात येऊन प्रार्थना करण्यात आली. स्टेज भारत मातेच्या, वंदे मातरम च्या विविध रांगोळ्यांनी सजले होते. देशप्रेमाची मोठी झलक स्टेज अवती भवती दिसून येत असल्याने सर्वांना देश प्रेम भारावून टाकत होते.

हाती अक्षदा घेतलेल्या सर्वांच्याच मनातून, चर्चेतून देशप्रेमाची भावना चर्चिली जात होती. निमित्त होते गणेश ठाकूर यांच्या ऐश्वर्या व भुसावळ येथील सागर यांच्या विवाह प्रसंगाचे प्रत्येकानेच आपल्या वीर जवानांचे व देशाविषयीच्या असलेले प्रेम अशाच प्रकारे व्यक्त करावे असा एक आदर्श ठाकूर व विसे यांच्या विवाह प्रसंगातून दिसून आला