सातपूर | प्रतिनिधी

ठक्कर डोम कोविड सेंटर प्रकल्प क्रेडाईचा आदर्श प्रकल्प ठरला आहे. समाजाचे आपण देणे लागतो’ या भावनेतून पूढे आलेले हात रेखीव वास्तूच्या उभारणीतून राज्यभरात कौतूकास पात्र ठरले आहेत. या सेंटरने लोकांवर उपचारच केले नाहीत, तर लोकांना जगण्याची कला देखील शिकवली आहे. क्रेडाई नाशिकच्या प्रयत्नांतून उभे राहीलेले विश्व आता लयास जाणार असल्याने शहराच्या सर्वच स्तरातून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

व्हिडीओ : दिनेश सोनवणे, देशदूत डिजिटल

शहरातील वाढती रुग्ण संख्या व रुग्णालयात अपूर्या पडणार्या जागा याची नोंद घेत पालकमंत्री छगन भूजबळ यांनी क्रेडाईला मदतीसाठी पूढे येण्याचे आवाहन केले. मनपाचे तात्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही याबाबत पाठपूरावा केला.

या प्रस्तावाला क्रेडाई राष्ट्रीय कार्यकारीणीचे पदाधिकारी जितूभाई ठक्कर, क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर, सुनिल कोतवाल किरण चव्हाण, सूरेश पटेल या मान्यवरांनी ताबडतोब होकार देत कोविड सेंटर उभारणीचा विडा उचलला.

ठक्कर डोमच्या 40 हजार चौरस फूटाच्या जागेवर हे सेंटर उभारण्याचा निर्धार करण्यात आला. क्रेडाई नाशिक सिटीचे अध्यक्ष रवी महाजन यांनी यासाठी निधी ची तयारी करुन उभारणीची जबाबदारी अनिल आहेर यांच्यावर सोपवली. त्यांनी क्रेडाईे पदाधिकारी अतूल शिंदे, अजन भालोदिया, नरेंद्र कुलकर्णी, सुशिल बागड, राजेश आहेर, गौरव ठक्कर, कृणाल पाटील यांच्या अथक परिश्रमांसह विविध सूचना व आकर्षक मांडणीतून कोविड सेंटर नव्हे तर हिलींग सेंटर निर्माण केले.

क्रेडाईच्या माध्यमातून उभारणीसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले. अतिशय अल्हाददायक वातावरणासोबतच रुग्णांचे मनोबल वाढवणारे केंद्र म्हणून त्यांना रुग्णही पसंती देत होते.

सुमारे 7 ते 8 डॉक्टर्स व 80 ते 90 वैद्यकिय कर्मचार्यांच्या माध्यमातून या रुग्णांना वैद्यकिय सेवा दिली जात होती. सुमारे 25 ते 30 काऊन्सलरर्सची टीम रुग्णांचे मनोबल वाढवण्याचे काम करीत होते.

सुमारे 340 बेडसच्या माध्यमातून उपचार देण्यात आले. कोविडच्या काळात याठिकाणाहुन सुमारे 3 ते 4 हजार रुग्ण बरे होउन घरी गेले. त्यात 1 महिन्याच्या तान्हा बाळापासून 95 वर्षाच्या आजोबांचा समावेश होता.

काउन्सलरची भूमिका महत्वाची

रुग्णाच्या पोटात उठणारी भितीची कळ कमी करुन त्याला सक्षम करण्याची भूमिका काऊन्सलरची आहे. औषधापेेक्षाही संंवादातून भिती दुर करण्याची भूमिका महत्वाची ठरलली आहे. या मार्गदर्शकाच्या माध्यमातून मनपाच्या मोठ्या रुग्णालयातून रुग्णांना प्रबोधन करणे गरजेचे ठरू लागल्याचे नागरकांचे मत आहे.

या कोविड सेंटर मधून लोकांना उपचारापेक्षा दिलासा देण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले होते. या माद्यमातून रुग्णांना उभारीदेण्यात यश मिळाल्याचे समाधान आहे. मात्र या निमित्ताने जमा झालेले साहीत्य पूढे रुग्ण सेवेसाठी उपयोगी यावे यासाठी प्रयत्न करणार आहोत.

अनिल आहेर (प्रकल्प प्रमुख क्रेडाई)

रुग्णसेवा देतानादाखल होणारा प्रत्येक पॉझिटीव्ह रुग्ण प्रचंड मानसिक तणावात होता. त्यांच्या मनातील भिती काढून त्याच्यात आत्मविश्वास भरणे गरजेचे होते. ते काम आम्ही केले. कूटूंबाने दूर लोटलेल्यांना मायेचा हात देण्याचे काम आमच्या टिमने केले. काही लोक येथून जाताना आणखी महिनाभर रहायची इच्छा व्यक्त करीत होते.
वैशाली नाईकवाडी (काउन्सलर, ठक्कर डोम कोविड सेंटर)

या कोविड सेंटरने लोकांना जगण्याची कला शिकवली. उपचाराला दाखल होताना दाटलेली भिती घालवून त्यांना उभारी देण्याचे काम केले आहे. या सेंटरवर सेवा देताना खर्या अर्थाने मानसोपचाराचा कसब पणाला लागला.वॅक्सिन आज आली. मात्र त्याभितीच्या वातावरणात उपचार देणे व रुग्णांना बरे करणे मोठे आव्हान होते.
राजेंद्र भंडारी (मुख्य वैद्यकिय अधिकारी मनपा)