उद्यान पुनर्वैभवासाठी ठाकरे गटाचे साकडे

उद्यान पुनर्वैभवासाठी ठाकरे गटाचे साकडे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

गंगापूररोडवर (Gangapur Road) जुन्या पंपिंग स्टेशनजवळ (pumping station) असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानाची (Shiv Sena chief Balasaheb Thackeray Udyan) देखभाली अभावी दूरवस्था झाली असून मनपाने त्वरित लक्ष न दिल्यास

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group) या उद्यानाला (garden) पूर्ववत झळाळी आणण्याचे काम हाती घेतले जाईल, असे निवेदन (memorandum) गटाच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner Chandrakant Pulkundwar) यांना दिले.

याबाबत आपण तातडीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. मनपातर्फे कोट्यवधी रुपये खर्चून गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशननजीक हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नांवाने स्मारक उभारले आहे.

लोकांमध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आठवण कायम चिरंतन रहावे आणि त्यांचे विचार लोकांमध्ये रुजावे हा स्मारक (monument) बांधण्यामागे खरा उद्देश होता. मात्र सध्या स्मारकाची दुरवस्था झाली असून स्मारकाला काटेरी झाडाझुडपांनी वेढले आहे. सरपटणार्‍या प्राण्यांचा वावर वाढला आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसते.

स्मारकात असलेल्या कार्यालयाचा वापर भंगाराचे साहित्य ठेवण्यासाठी, कपडे वाळविण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी केला जातो. तसेच कलादलनाचे दरवाजे तुटले असून छत केव्हा कोसळेल हे सांगता येत नाही, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, नाना पाटील, सचिन बांडे, रवींद्र जाधव, विरेंद्र टिळे, विनोद नूनसे, प्रमोद नाथेकर, दस्तगीर पानसरे, राजेद्र वाकसर आदींसह शवसैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com