नाशकात ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; शिंदे गटाने केला करेक्ट कार्यक्रम

नाशकात ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; शिंदे गटाने केला करेक्ट कार्यक्रम

नाशिक | Nashik

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नगरसेवकांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhary) यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर ठाकरेंच्या पक्षाला दुसरा मोठा धक्का बसला होता.

अशातच आता युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) हे आज नाशिक दौऱ्यावर असतांना पुन्हा एकदा नाशकात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का बसला असून काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

नाशकात ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; शिंदे गटाने केला करेक्ट कार्यक्रम
आगीत किराणा दुकान जळून खाक

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ठाकरे गटाच्या ५० हून अधिक जुन्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी (Activists) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वात या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला.

दरम्यान, एकीकडे आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून नाशकात आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु असून नेत्यांकडून नाशिक दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र ठाकरे गटातून शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत असल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

नाशकात ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; शिंदे गटाने केला करेक्ट कार्यक्रम
Nashik : सावकाराच्या जाचाला कंटाळून दोघांचे विषप्राशन; एकाचा मृत्यू

या पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश

शिवाजी पालकर माजी महानगरप्रमुख, राजेंद्र घुले माजी विभागप्रमुख पंचवटी, गणेश शेलार माजी विभागप्रमुख पंचवटी, सोपान देवकर माजी विभागप्रमुख पंचवटी, रामभाऊ तांबे मालेगाव स्टँड शाखा संघटक, भाऊसाहेब निकम माजी विभाग संघटक पंचवटी, मंगेश दिघे माजी उपविभाग प्रमुख, प्रशांत जाधव माजी उपविभाग प्रमुख, राजेंद्र जोशी माजी शाखा कार्याध्यक्ष मालेगाव स्टँड, विजय निकम माजी शाखा प्रमुख सितागुंफा, मयूर जोशी माजी शाखा प्रमुख, रणजीत खोसे माजी शाखा प्रमुख, निलेश शेवाळे माजी शाखा प्रमुख, दौलत बाबू शिंदे कार्याध्यक्ष वैदू समाज नाशिक, अमोल जोशी ज्येष्ठ शिवसैनिक नाशिक मध्य, नरेंद्र ढोले माजी शाखा प्रमुख पंचवटी, सुनील चव्हाण माजी विभाग प्रमुख पंचवटी, नामदेव पाईकराव माजी शाखा प्रमुख पंचवटी, ओमप्रकाश अग्रवाल, शंकरराव खेलूकर, बाळू मुरलीधर टिळे, कचरू महादेव आवारे, हिरामण दामू धोंगडे, बाबुराव अमृता बोराडे, विठ्ठल सोनवणे, सदाशिव लांडगे, पांडुरंग पुंजा ताजनपुरे, बबन किसन बोराडे, भाऊसाहेब कोंडाजी आवारे, नामदेव हरी बोराडे, कचेश्वर पोपटराव ताजनपुरे, बाळू भोसले, पोपट बाबू सोमवंशी, महादू लोखंडे,ज्ञानेश्वर लोखंडे, बापू रामा पाबळे, शंकर महादू शिंदे, अंबादास बाबुराव लोखंडे, अशोक पवार, रउफशेख रकीउद्दिन, राजेंद्र शिंदे, संतोष लोखंडे, सनी शिंदे, सतीश शिंदे,अजय शिंदे.

नाशकात ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; शिंदे गटाने केला करेक्ट कार्यक्रम
नाशिक : 'त्या' आत्महत्येप्रकरणी सावकारावर गुन्हा दाखल
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com