वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान :  प्रथम सत्राकरिता अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
नाशिक

वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान : प्रथम सत्राकरिता अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे यांची माहिती

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२०-२०२१ या शैक्षणिक तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील उमेदवाराकडून दि. ६ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती नागपूर येथील वस्त्रोउद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातुन बरगड (ओडिशा) करीता १३ व वेंकटगिरी करीता २ जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेद्वारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक आयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर / मुंबई/ सोलापूर/ औरंगाबाद यांचे मार्फत विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज १७ जुलै २०२० पर्यंत मागविण्यात आले होते. परंतु आय.एच.टी, बरगड यांच्या १५ जुलै २०२० या शैक्षणिक वर्षा करिता अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देवून ६ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे वेबसाईट http://http.www.dirtexmah.gov.in/ वर उपलब्ध असून, अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोउद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com