प्रेसच्या सुरक्षेची चाचणी; पोलीस, सीआयएसएफचे संयुक्त मॉकड्रील

प्रेसच्या सुरक्षेची चाचणी; पोलीस, सीआयएसएफचे संयुक्त मॉकड्रील

नाशिकरोड । प्रतिनिधी | Nashik Road

देशाची शान असलेल्या आणि एक रुपयांपासून पाचशेपर्यंतच्या नोटांची दरवर्षी कोट्यावधीच्या संख्येने छपाई (printing) करणार्‍या अभेद्य सुरक्षा व्यवस्थेच्या (security system) नाशिकरोडच्या (nashik road) सीएनपी नोट प्रेसच्या (CNP Note Press) पार्किंगमध्ये (parking) बॉम्ब (bomb) आढळल्याने सुरक्षा यंत्रणा, नागरिक, कामगारांची धावपळ उडाली.

पोलिस व औद्योगीक सुरक्षा दलाच्या (Police and Industrial Security Force) (सीआयएसएफ) जवानांनी युध्दपातळीवर परिसराची घेराबंदी करत बॉम्ब निकामी पथकाच्या मदतीने हा बॉम्ब निकामी केला. थोड्याच वेळात ही सुरक्षेची चाचणी घेणारी कवायत होती हे स्पष्ट झाल्याने नागरिकांना हायसे वाटले. प्रेसमध्ये अशी कवायत होण्याची अलिकडील काळातील ही तिसरी घटना असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या महत्वाच्या मॉकड्रीलमध्ये (Mockdrill) सीआयसएफचे शंभरावर जवान, गुप्तचर विभाग (Intelligence Department), नाशिक शहर आणि उपनगरचे पोलिस, गुप्तचर विभाग, शहर वाहतूक पोलिस (City Traffic Police), फायर ब्रिगेड (Fire Brigade), प्रेसचे वैद्यकीय पथक आदींनी सहभाग नोंदवत ही कवायत यशस्वी केली. नेहरूनगर, उपनगर पोलिस ठाण्याचे गेटचा रस्ता बंद केल्याने नागरिकांना ही कवायत बघता आली नाही. दोन्ही प्रेसमध्ये मिळून पाच हजार कामगार आहेत. नोट प्रेसमध्ये भारताबरोबरच परदेशी चलनी नोटांचीही छपाई केली जाते. सायंकाळी प्रेस सुटण्याच्या वेळी नेहरूनगर गेटजवळील पार्किंगमध्ये एका कामगाराला बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने तो सावध झाला.

या वस्तूमध्ये सर्किट, लाल दिवा, वायर असल्याने त्याने त्वरित प्रेसची सुरक्षा पाहणार्‍या सीआयएसफ (CISF) जवानाशी संपर्क साधला. या जवानांनी आपल्या वरिष्ठाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. अधिकार्‍यांनी पोलिस आयुक्तालय, कंट्रोलरुमशी संपर्क साधताच श्वान पथक, बॉम्बशोधक व निकामी पथक, उपनगर पोलिस शस्त्र व गाड्यांच्या ताफ्यासह दाखल झाले. रस्ते व परिसराची घेराबंदी करत नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला. बॉम्बभोवती वाळूची पोती लावण्यात आली. श्वान पथकाने माग काढला. तज्ञांनी हा बॉम्ब मोठ्या प्रयत्नाने निकामी केला.

प्रेसमध्ये अलिकडील काळात तीन वेळा मॉकड्रील करण्यात आले. पोसपोर्ट छपाई करणार्‍या आयएसपीमधील मॉकड्रीलमध्ये तर नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या ब्लॅक कमांडोंनी अतिरेकी हल्ला परतवत अतिरेक्यांचा हल्ला खात्मा केला होता. सीआयएसफच्या डेप्युटी कमान्डट कृतिका नेगी, असिटंट कमांडर मुकेश चतुर्वेदी, गुप्तचर विभागाचे हरभजनसिंग, बलवीरसिंग, सहायक पोलिस आयुक्त सिध्देश्वर धुमाळ, वरिष्ठ निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह सव्वाशे जवान, पोलिसांनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com