महानगर पालिकेतील संगणक प्रणालीची चाचणी

महानगर पालिकेतील संगणक प्रणालीची चाचणी

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 3 डिसेंबर 2020 पासून राज्यात लागू केली आहे. या नियमावलीनुसार संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीने विकसन परवानग्या देण्यासाठी शासनाने महाआयटी यांच्या सहकार्याने संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.

त्याअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रायोगिक तत्वावर एकूण 18 ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून संगणकीय प्रणालीतून नाशिक महानगरपालिकेने सर्वात पहिली परवानगी दिली आहे. अशा पद्धतीने यशस्वीरित्या संगणकीय प्रणालीची चाचणी झाली आहे.

एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली तसेच संगणकीय प्रणाली विकसित केल्यामुळे नागरिकांना तसेच वास्तुविशारद, अभियंता यांना वारंवार कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज भासु नये, या दृष्टीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव भूषण गगराणी, संचालक नांगनूरे, सह सचिव तथा संचालक शेंडे, सहसंचालक प्रतिभा भदाणे, तसेच शासन नियुक्त संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी असलेल्या टीमचे सह संचालक अविनाश पाटील, सहसंचालक (सेवा निवृत्त) भुक्ते व शैलेंद्र बेंडाळे, शहर विकास व नियोजन अधिकारी ठाणे महानगरपालिका, यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

या प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील सर्व प्रथम परवानगी पत्र महापालिका आयुक्त कैलास जाधव, सहसंचालक प्रतिभा भदाणे, सहाय्यक संचालक अंकुश सोनकांबळे, नगर नियोजन विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वास्तुविशारद अजित कुलकर्णी यांना देण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com