कोयता गँगची दहशत गंगा घाटापर्यंत..

कोयता गँगची दहशत गंगा घाटापर्यंत..

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पुण्यातील कोयता गँगच्या (Koyata Gang) घटनानंतर आता नाशिक शहर परिसरात रात्रीच्या वेळी हातात कोयते घेऊन काही तरुण दहशत पसरवीत असल्याच्या घटना वाढत आहे. नुकताच गंगापूर (Gangapur) पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून कोयता गँगची दहशत आता गंगा घाटापर्यंत पोहोचत असल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

येथील गंगाघाट (Gangaghat) परिसरात देशभरातून तसेच परदेशातून दररोज हजारो भावीक येत असतात, तरी या ठिकाणी अनेक लहान मोठ्या गल्ल्या असून नागरिकांची भरगच्च वस्ती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार श्रीराम तसेच गरुड रथ सणाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच एक एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास काही तरुणांनी या ठिकाणी देखील हातात कोयते घेऊन दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान रविवारी 2 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ऋतुराज हाईटस या बिल्डींग समोर शिवाजीनगर परिसरातील संभाजी कॉलनी चौकात, गंगापुर रोड परिसरातही दहशत माजवण्याच्या उद्देशाने हातात बेकायदेशीर रित्या विनापरवाना लोखंडी धारदार कोयता घेवुन मोठमोठयाने आरडाओरड व शिवीगाळ करणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.

कोयता गँगची दहशत गंगा घाटापर्यंत..
IPLवर कोरोनाचे सावट; 'या' दिग्गजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह

त्यांच्या विरुध्द भारतीय हत्यार कायदा (Indian Arms Act) कलम 4 / 25 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सोनू सिताराम खाडे (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

त्यानुसार रोशन निवृत्ती कडलग (वय 19, रा. कार्बननाका शिवाजीनगर नाशिक), अब्दुल रेहमान बरकतअली अन्सारी (वय 19, रा. पाण्याच्या टाकीजवळ शिवाजीनगर) व संघर्ष मोरे (रा. धर्माजी कॉलनी असे ऋतुराजहाईटस संभाजी काँलनी शिवाजीनगर नाशिक) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

कोयता गँगची दहशत गंगा घाटापर्यंत..
उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com