Video : गॅस गळतीमुळे भीषण स्फोट; चार जण जखमी

Video : गॅस गळतीमुळे भीषण स्फोट; चार जण जखमी

नवीन नाशिक । Nashik

खुटवड नगर परिसरातील देवकी बंगलो या ठिकाणी गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याची घटना घडली.

सकाळी सातच्या सुमारास हा भीषण स्पॉट झाला. यामध्ये चार जण झाले असून बंगल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान स्फोट इतका भीषण होता कि बंगलो चे गेट उडून रस्त्यावर गेले. तसेच आजूबाजूच्या काही बंगल्याच्या काचा देखील फुटल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

सकाळच्या सुमारास घरातील गृहिणी दूध तापवण्यासाठी गेली. यावेळी लायटर लावताच गॅसचा भडका उडून भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती कि बंगल्याच्या भिंती देखील कोसळल्या आहेत. दोन वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात चार जणजखमी असून यात एका बालकाचा समावेश आहे. जखमींना जवळच्या खाजगीरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com