तारवाला सिग्नलवर ट्रक-आयशरमध्ये भीषण अपघात

तीन जखमी, रस्त्यावर मीठ साखरेचा खच
तारवाला सिग्नलवर ट्रक-आयशरमध्ये भीषण अपघात

पंचवटी | Panchavti

पेठरोड वरील (Pethroad) शरदचंद्र पवार मार्केट जवळील (Sharadchandra Pawar Market) सिग्नलवर पहाटेच्या सुमारास आयशर क्र. (एमएच ४८ बीएम २०६७) आणि मालट्रक क्र. एमएच १६ सीसी ७४९५ यांच्यात (Major Accident) समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यात वाहनातील दोन ते तीन जण (Three Injured) जखमी झाले आहे.

पोलीस पहाटे पासून घटनास्थळी असून दोन्ही वाहने रस्त्यातून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. भर रस्त्यात अपघात झाल्याने वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचे चित्र होते.

तसेच दोन्ही मालवाहतूक वाहने साखर आणि मिठाने भरलेली असल्याने रस्त्यावर सगळीकडे मीठ साखरेचा खच पडला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com