नाशिकरोड परिसरात जमावामुळे तणाव; पोलिस बंदोबस्तानंतर परिस्थिती नियंत्रणात

नाशिकरोड परिसरात जमावामुळे तणाव; पोलिस बंदोबस्तानंतर परिस्थिती नियंत्रणात
USER

नाशिक रोड । प्रतिनिधी

आज रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दरम्यान प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना ही गर्दी हटवावी लागली.

दरम्यान यातील काही तरुणांनी दगडफेक केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला दगडफेक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पळापळ झाल्याने पोलिसांनी तातडीने जमावाला आवरले.

रात्री काही प्रमाणात गर्दी कमी झाली त्यानंतर परिसरात बॅरिकेड लावून गर्दी थांबविण्यात आली नाशिक रोड परिसरातील अनेक रस्ते पोलिसांनी बॅरिकेड लावून बंद केले आहे आज रात्री आठ वाजे नंतर कडक निर्बंध लागू केलेले असतानासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हजारो कार्यकर्ते बाहेर पडले त्यामुळे छत्रपति शिवाजी पुतळा चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दरम्यान प्रचंड गर्दी झाली.

या गर्दी मधील काही तरुणांनी दगडफेक केल्याने तणावपूर्ण वातावरण झाले मात्र पोलिस बंदोबस्त आल्यानंतर जमाव पांगला आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com