
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शुक्रवारी (दि.०७) रोजी दुपारी शहरातील शिंगाडा तलाव (Shingada Lake) येथील कार डेकॉर व्यावसायिक आणि कामगारांमध्ये वेगवेगळ्या कामांच्या संदर्भात शुल्क आकारण्याच्या कारणावरून तसेच पार्किंगवरून वाद (Dispute) झाल्याची घटना घडली होती...
यानंतर मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी शुक्रवारी (दि.०७) रात्री उशिरापर्यंत गुन्हेगारांची धरपकड केली. त्यानंतर आज सकाळपासून या संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण दिसत असून परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, याठिकाणी पोलिसांचा (Police) मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून कार डेकोरची बरीचशी दुकाने बंद आहे. एका टोळक्याने (Gang) धारदार शस्त्रांसह हल्ला केल्याने या भागात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.