नाशकात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; दहा वर्षीय मुलावर हल्ला

नाशकात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; दहा वर्षीय मुलावर हल्ला
File Photo

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिकवणीसाठी जाणाऱ्या दहा वर्षीय मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला (Dogs Attack) केल्याची घटना सिन्नर (Sinnar) येथे घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे....

याबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल अरविंद भांडगे (१०. रा. विठ्ठलेश्वर मंदिराजवळ, शिंपी गल्ली) हा मुलगा सोमवारी दुपारी सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या (Sinnar Public Library) बेसमेंटमधून सांगळे कॉम्प्लेक्स येथे शिकवणीसाठी जात होता.

File Photo
ई-बाईकने घेतला अचानक पेट; पार्किंगमधील इतर गाड्यांचेही मोठे नुकसान

वाचनालयाच्या बेसमेंटमध्ये पाच ते सहा कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. आवाज ऐकून वाचनालयाच्या अभ्यासिकेतून विद्यार्थी व नागरिक मदतीला धावून गेले. त्यांनी कुणालला कुत्र्यांच्या तावडीतून कसेबसे सोडवले. या घटनेत कुत्र्यांनी कुणाल याच्या मांडी, खांदा व दंडाला चावे घेतले असून भिंतीवर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे.

तसेच या वाचनालयाच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या खाटीक गल्लीत मांसाचे तुकडे मिळतील या अपेक्षेने असंख्य कुत्रे या ठिकाणी घोटाळत असतात. त्यातील काही कुत्रे विसाव्याला वाचनालयाच्या बेसमेंटला येऊन बसतात.

File Photo
Visual Story : आसाममध्ये हाहाकार; अंगाचा थरकाप उडवणारे फोटो आले समोर

एकट्याने जाणाऱ्या येणाऱ्यांच्या अंगावर ही कुत्री धावून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या मुलावर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण प्रकार वाचनालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान या घटनेनंतर सिन्नर वाचनालय व्यवस्थापनाने नगर परिषदेला पत्र दिले असून परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असल्याची माहिती अध्यक्ष कृष्णा भगत यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com