रेशनचा दहा टन तांदूळ जप्त

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई
रेशनचा दहा टन तांदूळ जप्त

देवळा । प्रतिनिधी Devla

गुजरात राज्यात मालेगाव येथून अवैधरित्या विक्रीसाठी For sale illegally नेला जात असलेला स्वस्त धान्य दुकानातील 1 लाख 50 हजार रूपये किंमतीचा 10 हजार किलो तांदुळाचा साठा Stocks of rice विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांनी नियुक्त केलेल्या विशेष पोलीस पथकाने उमराणेजवळ Umrane छापा मारून जप्त केला. या कारवाईने रेशनच्या धान्याचा काळाबाजार Black market of ration grainsकरणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

मालेगाव येथून उमराणेमार्गे गुजरात येथे रेशनचा तांदुळ अवैधरित्या विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन जात असलेला मालट्रक विशेष पोलीस पथकाने जप्त करीत याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरातच्या दिशेने मालट्रक क्र. एम.एच. 41 जी.-6815 मध्ये 1,50,000 रुपये किमतीचे सुमारे 50 किलो वजनाचे एकुण 200 कट्टे शासकीय सार्वजनिक वितरणाचे तांदुळ धान्य किमंत बाजारभाव प्रमाणे 15 रुपये प्रती किलो (शासकीय किमत 3 रुपये प्रती किलो) सह मालट्रक असा सुमारे 6,50,000 किमतीचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्रातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नेमणुक केलेल्या पथकाने सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर उमराणे उड्डाणपुलाजवळ रेशममोती वजनकाट्यासमोर ललीत शेठ रा. मालेगाव हा त्यांचे हस्तक रविंद्र पंडीत पाटील (रा. सायने बुद्रुक मालेगाव (ट्रक चालक), दिनेश साहेबराव पवार (रा. मथुरपाडा, येसगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक (ट्रक क्लिनर) हे मालेगाव ते उमराणेमार्गे वापी राज्य गुजरात येथे शासकीय सार्वजनिक वितरणाचे तांदुळ अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जातांना मिळुन आले.

याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात देवळा पुरवठा निरीक्षक ज्योती कपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.