केटीएचएममधील विद्यार्थ्यांना दहा हजाराची शिष्यवृत्ती

केटीएचएममधील विद्यार्थ्यांना दहा हजाराची शिष्यवृत्ती

नाशिक । Nashik

ब्लू क्रॉस लॅबोरेटरीस तर्फे दर वर्षी प्रमाणे केटीएचएम महाविद्यालयातील हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना शासनाची व इतर शिष्यवृत्ती मिळालेली नाही, अशा विद्यार्थ्यांमधून गुणवत्ता व त्याची आर्थिक परिस्थिती या निकषावर विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

ह्या वर्षी संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, बी बी ए, बी.व्होक प्रिंटिंग टेक्नॉलॉजी व इंटिरियर डिझाईन विभागातील एकूण ४५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड करण्यात आली. सदर शिष्यवृत्ती सलग तीन वर्ष विद्यार्थांची पदवी पूर्ण होई पर्यंत दर वर्षी दहा हजार रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

शैक्षणिक कारकीर्दीच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या क्षमतेस ओळखून त्यांना भविष्यातील उद्दीष्टे साध्य करण्यासाठी आम्ही ही शिष्यवृत्ती प्रदान करून प्रेरणा देत असतो, असे ब्लू क्रॉस कंपनीचे संजीव माहुली म्हणाले.

सर्व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे म.वि.प्र.संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते , चिटणीस डॉ सुनिल ढिकले , प्राचार्य डॉ. व्ही.बी.गायकवाड यांनी अभिनंदन केले. सदर शिष्यवृत्ती साठी जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. एस. एन. पाटील व संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम.एन. शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com