अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने उडवले

अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने उडवले

नाशिक | Nashik

शहरातील अमरधाम परिसरात (Amardham Area) अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत १५ जण जखमी (Injured) झाले असून यात कारमधील चार तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दहा जणांचा समावेश आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, भद्रकाली हद्दीच्या जुन्या नाशिकमधील (Old Nashik) शितळादेवी मंदिरासमोरील अमरधामला सिटी लिंक बस (City Link Bus) वाहकाच्या अंत्यविधीसाठी (funeral) आलेल्या दहा जणांना पंचवटी अमरधामकडून नानावलीकडे भरधाव वेगाने आलेल्या कारने समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत रस्त्यावर उभे असलेले दहा तर कारमधील पाच असे पंधरा जण जखमी झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे (Bhadrakali Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे (API Chandrakant Sapkale) यांच्यासह कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना खाजगी वाहनात बसवून जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com