संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टला 'इतक्या' लाखांचे उत्पन्न

संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टला 'इतक्या' लाखांचे उत्पन्न

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

गेली दोन वर्षे करोना प्रादुर्भावामुळे मंदिर बंद होते. मात्र, यंदा प्रथमच पंढरपूर वारी झाली. यादरम्यान, त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टला दहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. याबाबतची माहिती संस्थानकडून देण्यात आली आहे....

पायी दिंडी सोहळ्यामुळे लाखो भाविक यंदा सुखावले. दोन वर्षाच्या खंडानंतर प्रथमच पायी वारी झाली. पालखीतील रथात दान पेटी व कळशी परंपरेनुसार ठेवण्यात आली होती. पूर्वीपासून पालखीत ठेवण्यात येणारी तांब्याची कळशी भाविकांचे लक्ष वेधून घेत असते.

भाविक या कळशीतच दान टाकत असतात. कळशीतील दानातून 7 लाख 13 रुपयांचे दान मिळाले. तर मंदिर ट्रस्टला अडीच लाखांचे दान देणगी पावतीतून मिळाले. मे महिन्यात संत निवृत्तीनाथ मंदिरातील दानपेटीत तीन लाख 72 हजाराचे दान मिळाले होते.

अलीकडेच मंदिरात पालखी परतली तेव्हा सहधर्मादाय आयुक्त टी. एस. अकाली यांनी दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी भाऊसाहेब गंभीरे, जयंत महाराज गोसावी आदी उपस्थित होते. आता आधुनिक दान पेट्या निघाल्या. पण जाड कलात्मक अशी दान टाकण्यासाठी वापरली जाणारी दुर्मिळ कळशी अनोखी असल्याची प्रतिक्रिया याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com