सातपूरला दहा दिवसांचा जनता लॉकडाऊन

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय
सातपूरला दहा दिवसांचा जनता लॉकडाऊन

सातपूर | Satpur

कोरोना या महामारीचा उद्रेक बघता लॉक डाऊन शिवाय पर्याय नसल्याने सोमवारपासून (दि.19) सातपूर शहरात स्वयंस्फूर्तीने लॉक डाऊन पाळणार असल्याची घोषणा सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली.

सातपुर शहरातील सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन सामुदायिक कडक लॉकडाऊन ची मागणी करणारे निवेदन आ. सिमा हिरे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

सातपुर परिसरात गेल्या काही दिवसांत मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यात मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.राज्य शासनाने लॉकडाऊन जाहिर केला असला तरी मोठया प्रमाणावर नागरीक रस्त्यावर दिसत आहेत.

त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र आले व त्यांनी सातपूर प्रभाग विभागात जनता कर्फ्यू प्रमाणे सोमवार पासुन दहा दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्याचा एकमताने निर्णय घेतला.

या आशयाचे पत्र आमदार सिमा हिरे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी देखील या निर्णयाचे स्वागत करत सर्व नगरसेवकाना परिसरात वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंस्फुर्तीने केलेल्या प्रयत्नाबद्दल धन्यवाद दिले.

या निवेदना नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनच्या माध्यमातून परिसरात कडक लॉकडाऊनचा अवलंब करावा व त्याला सर्व राजकिय नेते व लोकप्रतिनिधी सक्षम पणे पाठीशी उभे राहतील असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर विवीध राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकारींनी स्वाक्षऱ्यां केल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com