चोरट्यांकडून दहा दुचाकी हस्तगत

अंबड पोलिसांची कामगिरी
चोरट्यांकडून दहा दुचाकी हस्तगत

नवीन नाशिक | Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीत दुचाकीची चोरी करणाऱ्या तिन जणांना अंबड पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचत अटक करून त्यांच्याकडून दहा दुचाकी हस्तगत केल्या.

याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीत होटेल उत्सव समोर दुचाकी वाहन चोरी गेले होते.

यासोबतच औद्योगिक वसाहतीत वाहन चोरी चे प्रकार घडत असल्याने पोलीस आयुक्त दीपक पांडे उपयुक्त विजय खरात सहाय्यक आयुक्त सोहेल शेख यांच्या सूचनेनुसार व अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी, कमलाकर जाधव, श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने आपल्या खबऱ्यांच्या मार्फत शोध घेण्यास सुरुवात केली. यावरून सपोनि गणेश शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन इसम अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पद रित्या फिरत आहेत.

यावरून पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली. यामध्ये रोहित उर्फ गणेश नितीन मालवणकर (२० रा. बालगृह विठ्ठलवाडी देवळाली कॅम्प नाशिक ) ऋषिकेश शशिकांत जाधव (२० रा. ढिकले मळा फ्लॅट नंबर १२ कैलास पॅलेस, जेलरोड ) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बजाज कंपनीची डिस्कवर गाडी सह एकूण 9 दुचाकी वाहन हस्तगत करून तीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

यासोबतच तडीपार अक्षय उत्तम जाधव ( 24 राहणार साई दर्शन अपार्टमेंट ,फ्लॅट नंबर 8 ,दत्तनगर चुंचाळे )याला अटक करून त्याच्याकडून चोरीची बुलेट गाडीहस्तगत केली.

ही मोहीम सपोनि गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम सोनवणे ,पोलीस नाईक राकेश निकम, किरण गायकवाड, विजय पगारे ,संदीप लहाने, पोलीस शिपाई मुरली जाधव, हेमंत आहेर, अनिरुद्ध येवले, राकेश राऊत, मुकेश गांगुर्डे, नितीन सानप, प्रशांत नागरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com