मालेगाव दंगल प्रकरणी पाच गुन्हे दाखल दहा जणांना अटक

मालेगाव दंगल प्रकरणी पाच गुन्हे दाखल दहा जणांना अटक

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

मालेगाव बंदला (malegaon bandh) दगडफेक (Stone pelting) तोडफोडीच्या घटनांनी हिंसक वळण देण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न पोलिसांनी (police) कौशल्याने बळाचा वापर करीत उधळून लावल्याने रात्री दहानंतर शहराचे जनजीवन पूर्वपदावर आले संपूर्ण शहरात सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आज दिवसभरात एकही अनुचित प्रकार घडला नाही, त्यामुळे पोलीस यंत्रणेस जनतेला मोठा दिलासा मिळाला.

दरम्यान दंगली (Riot) सह प्राणघातक हल्ले (Deadly attacks) सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान (Damage to public property) मोर्चा काढणे व कट रचने आधी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन तर आयशा नगर ठाण्यात दोन असे पाच गुन्हे 41 दंगलखोरां विरुद्ध दाखल करण्यात येऊन दहा जणांना आज पोलिसांनी अटक केली आहे.

दंगलग्रस्त भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते तपासून उपद्रव (Nuisance) करणाऱ्यांना अटक केली (Arrested) जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी (Upper Superintendent of Police Chandrakant Khandvi) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

त्रिपुरातील हिंसाचाराच्या (Violence in Tripura) निषेधार्थ येथील सुंन्नी जमेतुल उलमा (Sunni Jameetul Ulama) व रजा अँकडमी (Reza Academy) सह विविध धार्मिक संघटनांनी (Religious organizations) शुक्रवारी पुकारलेल्या मालेगाव (malegaon) बंदला दुपारी साडेतीन वाजे नंतर संतप्त तरुणांनी मोर्चे काढत दगडफेक तसेच नवीन बस स्थानकासह (Bus stop) परिसरातील दवाखाने (hospitals) व दुकानांची तोडफोड (Vandalism of shops) करत हिंसक वळण लावले होते या जमावास रोखणाऱ्या पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.

गेल्याने तीन अधिकार्‍यांसह सात पोलीस असे दहा व दोन सामाजिक कार्यकर्ते असे तेरा जण जखमी झाले होते तब्बल तीन ते चार तास हा धुडगुस दंगलखोरांचा सुरु होता अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी उपाधीक्षक लता दोंदे अधिकाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत तसेच मिरची सेलचा वापर करीत जमावास जुना आग्रा रोड वरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराकडे सरकून न दिल्याने मोठा अनर्थ टळला होता. अतिरिक्त पोलीस कुमक दाखल होतात दंगलखोरांना पिटाळून लावण्यात पोलिसांना यश आल्याने रात्री दहा वाजे नंतर जुना आग्रा रोड परिसरात शांतता पसरून जनजीवन पूर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला होता.

नाशिक (nashik) परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर, जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील आदी अधिकारी रात्रीच मालेगावी दाखल झाले आहे या हिंसाचाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुरेश धुसर, पो काँ पावरा, व अनवर खान ईस्माईल खान यांच्या फिर्यादीवरून तीन गुन्हे तर आयशा नगर ठाण्यात पो काँ भारत पाटील व पो काँ शाम पवार यांच्या फिर्यादीवरून दोन असे पाच वेगवेगळे गुन्हे 41 जणांविरुद्ध दाखल करण्यात आली असून दहा जणांना अटक करण्यात आली आहे तर 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

बंदोबस्तात वाढ

शहरात घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्यांसह सहाशे अधिकारी पोलिसांची अतिरिक्त कुमक शहरात बाहेरून पाचारण करण्यात आली आहे संवेदनशील भागात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैणात करण्यात आला असून परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी उपाधिक्षक लता दौदे यांनी देशदूत शी बोलताना दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com