नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने राज्यातील विद्यापीठ आणि अन्य उच्चशिक्षण संस्थांमध्ये 2020-2021 मध्ये व्यवस्थापन पीजी अभ्यासक्रमांच्या (एमबीए, एमएमएस) प्रवेशासाठी आयोजित सामायिक प्रवेश परीक्षा 2020 च्या कौन्सिलिंग अंतर्गत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर केली आहे. ही यादी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर cetcell.mahacet.org जाहीर करण्यात आली आहे.

जे उमेदवार एमबीए आणि एमएमएस कोर्सेससाठी आयोजित कौन्सिलिंग प्रक्रियेत सामील झाले होते ते आपला अॅप्लिकेशन आयडी आणि नाव आदी माहिती देऊन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहू शकतील. एमबीए अभ्यासक्रमाची अंतिम गुणवत्ता यादी 7 जानेवारी रोजी जाहीर केली जाणार आहे.

उमेदवारांनी नाव किंवा अॅप्लिकेशन आयडी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये चेक करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी. तेथे पीजी कोर्सेसच्या विभागात एमबीए/एमएमएसशी संबंधित लिंकवर क्लिक करावे.

यानंतर नव्या पेजवर ऑल इंडिया किंवा महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी जारी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर संबंधित मेरिट लिस्ट पीडीएफ फॉरमॅटमध्ये उघडेल. यात उमेदवार आपला अॅप्लिकेशन आयडी किंवा नाव तपासू शकतील.