शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची प्रसिध्द

शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची प्रसिध्द

नाशिक | Nashik

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council) दि. १२ ऑगस्ट, रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam) (इ. ८ वी) या परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय तात्पुरती उत्तरसूची (Answer Key) प्रसिध्द करण्यात आली आहे.

त्यानुसार उत्तरसूचीवर आक्षेप असल्यास परिषदेच्या संकेतस्थळावरुन दि.२४ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन निवेदन (Online statement) करता येईल.

प्राप्त निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची (Final Answer Key) परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. यासदर्भात परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांना www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे.

दरम्यान ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने अर्ज पाठविल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, आयुक्त तथा अध्यक्ष, तुकाराम सुपे यांनी दिली.

ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध.

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, शहरी / ग्रामीण इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी दिनांक २४ ऑगस्ट ते .०२ सप्टेंबर पर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com