मंदिरे होतीलच पण विद्यामंदिर गरजेचे: जाधव

जानोरी ग्रा. पं. पदाधिकार्‍यांचा सत्कार
मंदिरे होतीलच पण विद्यामंदिर गरजेचे: जाधव

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

जिल्हा परिषद (zilha parishad) शाळेतील (school) गुणवत्ता आणि शिक्षक (teachers) हे आदर्शवत असून

गावच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषद शाळा (zilha parishad school) आधुनिक करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शाळेचा विकास (School development) करतांना राजकीय (politic) जोडे बाहेर काढून विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. मंदिर तर होतीलच पण विद्यामंदिर आजची प्रमुख गरज आहे. त्यातच देशाचे उद्याचे भविष्य ठरणार असल्याचे प्रतिपादन मविप्रचे संचालक प्रवीण जाधव (Praveen Jadhav) यांनी केले.

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) जानोरी (janori) येथील जिल्हा परिषद शाळेत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख सत्कारार्थी म्हणून मविप्र संचालक प्रवीणनाना जाधव हे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी गावचे जेष्ठ नेते शंकरराव वाघ होते. यावेळी भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Bharat Ratna Former President Dr. A. P. J. Abdul Kalam) यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी (school) स्वागतगीत सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नाना गंगावणे यांनी केले. शाळेत राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती व आढावा शिक्षिका मंदा पिंपळे यांनी सांगितला. यावेळी नवनिर्वाचित मविप्र समाज संस्थांच्या संचालकपदी निवड झालेले माजी

जि. प. गटनेते प्रवीण जाधव, कादवा गौरव पुरस्कारार्थी अनिल चौगुले, गजानन अ‍ॅग्रो फिड्स कंपनीकडून शाळेला संरक्षण भिंत बांधून दिल्याबद्दल कंपनीचे रवी पठारे, गोविंद घुमरे, सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, ग्रा. पं. सदस्य गणेश तिडके, विलास काठे, गणेश विधाते, युवराज चारोस्कर, करण नेहरे, कमल केंग, वैशाली विधाते, रोहिणी रा. वाघ, योगिनी पगारे, रोहिणी वि. वाघ, चित्रलेखा तिडके, रूक्मिणी लहांगे आदी नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्य तसेच आदिंचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेतील अडचणी व आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप गुंजाळ यांनी केले. यावेळी सर्व मागण्या लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी दिले. यावेळी माजी पोलीस पाटील सुरेश घुमरे, बाळासाहेब घुमरे, ज्ञानेश्वर विधाते, योगेश तिडके, कृष्णा लहांगे, चिंतामण श्रीखंडे, विकास केंग आदी उपस्थित होते. शंकरराव वाघ यांनी शाळेत सुरू असलेल्या उपक्रमाविषयी कौतुक केले.

शाळेच्या विविध मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासनही नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या वतीने देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रमिला कापडणीस, मनिषा गायकवाड, प्रिया वरोडे, मंगल ठाकरे आदी शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना गरूड यांनी केले तर आभार लीना गोसावी यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com