ओझर नगरपरिषदेच्या प्रशासकपदी तहसीलदार शरद घोरपडे

सरपंचपदाची निवडही रद्द
ओझर नगरपरिषदेच्या प्रशासकपदी तहसीलदार शरद घोरपडे
USER

निफाड । Niphad

ओझर नगरपरिषदेची अंतिम अधिसूचना शुक्रवार (दि. १८) रोजी प्रसिद्ध झाल्याने ओझरचा कारभार शासनाने निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांच्याकडे सोपविला.

AD

त्यामुळे शुक्रवार (दि.२६) रोजी होणारी सरपंचपदाची निवडही रद्द झाली आहे. माजी आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नांने नुकतीच ओझर नगरपरिषद अस्तित्वात आली आहे. शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी यासंदर्भात अंतिम अधिसूचना राज्यपालांच्या आदेशाने प्रसिद्ध केली आहे.

ओझर नगरपरिषदेसाठी माजी आमदार अनिल कदम यांचा शासनाकडे पाठपूरावा सुरू होता. अखेर ओझर नगरपरिषद अस्तित्वात आली. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह नगरविकास विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य माजी आमदार अनिल कदम यांना लाभले.

निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे आता ओझरचा प्रशासक म्हणून कारभार पाहतील. आगामी ओझर नगरपरिषद निवडणुकीसाठी आताच मोर्चेबांधणी सुरू झाली असून प्रभाग रचनेनंतर खरी रंगत येणार आहे

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com