वंचितांपर्यंत विकास पोहोचवण्याचे गुरुजनांचे कार्य अलौकिक : झिरवाळ

‘आपुलकी’कडूनगुणवंत शिक्षकांचा सन्मान
वंचितांपर्यंत विकास पोहोचवण्याचे गुरुजनांचे कार्य अलौकिक : झिरवाळ

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

दुर्गम भागातील आदिवासी समाजापर्यंत (tribal community) विकासाचे सूर्यकिरण पोहोचले नाहीत. अशा वंचित घटकांपर्यंत विकास (Development) पोहोचवण्याचे गुरुजनांचे (teachers) कार्य अलौकिक असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ (Deputy Collector Hiraman Jirwal) यांनी केले.

आपली आपुलकी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने (multi-purpose charitable organization) शिक्षक दिनाच्या (teacher's day) पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 22 गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी स्वामी परिपूर्णांनंदजी महाराज, आपुलकी संस्थेचे अध्यक्ष खंडेराव डावरे, मविप्रचे माजी शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे, विष्णुपंत हगवणे, प्राचार्य सुरेश शिंदे, चेतना सेवक उपस्थित होत्या.

पंचवटीतील (panchavati) तपोवन (Tapovan) परिसरातील भारत सेवाश्रम संघात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी जिल्ह्यातील 22 गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी अतुल मानकर यांच्या सहकार्यातून खेळाडूंना स्कूलबॅगचे वाटप (Distribution of schoolbags) करण्यात आले. कार्यक्रमास मुक्त विद्यापीठाचे लक्ष्मण शेंडे, ॠणानुबंध प्रशिक्षण संस्थेचे दुर्वादास गायकवाड, संजय गवळी, गीतेश्वर खोटरे, सुभाष जगदाळे, तानाजी ढोबळे, केशव रायते, कविता डावरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास शिंदे यांनी केले. आभार बलराम माचरेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शांताराम गायकवाड, जयवंत राऊत, सतीश चितोडकर यांनी परिश्रम घेतले. गुणवंत शिक्षकांपैकी उमेश आटवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

गुणवंत शिक्षक याप्रमाणे : उमेश आटवणे (नाशिक), दीपक गावित (नाशिक), अश्विनीकुमार येवला (नाशिक), अजय निटुरे (सुरगाणा), गोकुळ हिरे (नाशिक), दिलीप बेंडकोळी (त्र्यंबक), संतोष बेलदार (येवला), बाळासाहेब सोनवणे (नाशिक), अरुणा गावित (नाशिक), भरत वाघ (सिन्नर), संगिता गणोरे (नाशिक),

मनोहर जाधव (पेठ), उत्कर्ष कोंडावार (दिंडोरी), शशिकांत केदार (नाशिक), पोपट खंडिझोड (दे. कॅम्प), हेमंत निकम (इगतपुरी), सावळीराम पालवी (कळवण), वैष्णवी रोकडे (नाशिकरोड), प्रा. रामनाथ रावळ (नाशिक), दीपाली सुरवसे (नांदगाव), संदीप सूर्यवंशी (मालेगाव) यांचा सन्मान करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com