शिक्षक, विद्यार्थ्यांची हजेरी आता डिजिटल

शिक्षण विभागाकडून महास्टुडंट अ‍ॅपला मान्यता
शिक्षक, विद्यार्थ्यांची हजेरी आता डिजिटल

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची उपस्थितीAttendance of students and teachers डिजिटल पद्धतीने digital Process नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने Department of School Education मान्यता दिली आहे.

महास्टुडंट अ‍ॅपद्वारे MahaStudent app ही माहिती नोंदवावी, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरावर विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती तत्काळ कळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजिटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ हा निर्देशांक विकसित केला असून यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने उपस्थिती यासाठी गुण देण्यात येणार आहेत. यादृष्टीने राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणालीमध्ये ही उपस्थिती नोंदविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अ‍ॅपचे फायदे

या अ‍ॅपमुळे विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही, असे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com