नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा व शहरातील शाळा 4 जानेवारीपासुन सुरू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानंतर जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासंदर्भातील तयारी शिक्षण विभागाकडुन केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका शिक्षण मंडळांकडुन गेल्या 24 डिसेंबर पासून शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या सुरु करण्यात आल्या आहे. आजपर्यत 455 शिक्षकांच्या चाचण्या पुर्ण झाल्या असुन यात केवळ शिक्षिका करोना पॉझिटीव्ह आढळून आली आहे.

राज्य शासनाकडुन प्राथमिक व माद्यमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे. स्थानिक करोना रुग्णांची स्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहे.

यानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी दोन आठवड्यापुर्वी जिल्ह्यातील शाळा या 4 जानेवारी 2021 पासुन सुरू केल्या जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर शिक्षण विभागाकडुन जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भातील तयारी सुरू केली आहे. यात शाळा सुरु करण्यासंदर्भात नियमावली घालून दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर शाळातील शिक्षकांच्या आरटीपीआर चाचण्या करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यात गेल्या 24 डिसेंबर पासुन शिक्षकांच्या करोना चाचण्या सुरु करण्यात आल्या आहे.

यात महापालिका शिक्षण मंडळातील 1783 शिक्षक आणि 707 शिक्षकेत्तर कर्मचारी अशा एकुण 2490 जणांच्या करोना चाचण्या सुरु करण्यात आल्या असून आत्तापर्यत 455 शिक्षकाच्या चाचण्या झाल्या आहे. यांत केवळ एक शिक्षिका करोना बाधीत असल्याचे समोर आले आहे. या चाचण्या करतांना ज्या शिक्षकांत कोणतेही लक्षणे दिसत नाही, अशांचा चाचण्यास केल्या जाऊ नये असे निर्देशही प्रशासनाने दिले आहे.