अशैक्षणिक कामांना शिक्षकांचा विरोध; आ.डॉ. आहेर यांना निवेदन

अशैक्षणिक कामांना शिक्षकांचा विरोध; आ.डॉ. आहेर यांना निवेदन

देवळा । प्रतिनिधी | Devla

शिक्षकांना (teachers) शैक्षणिक कामाव्यतिरिक्त (Academic work) अवांतर कामे देऊ नयेत.

तसेच शिक्षण विभागाच्या (Education Department) आस्थापनेतील सर्व पदांची त्वरित भरती करावी, अशी मागणी देवळा तालुका शिक्षक समन्वय समितीच्या (Devla Taluka Teachers Coordinating Committee) वतीने आ.डॉ. राहुल आहेर (MLA Dr. Rahul Aher) यांच्याकडे निवेदनाद्वारे (memorandum) करण्यात आली.

शिक्षकांना निवडणुकीची (election) कामे दिली होती. त्याच कालावधीत शैक्षणिक कामांचा वाढलेल्या व्यापाबाबत तहसीलदारांना कल्पना दिली असता विचार करून त्यांनी प्राथमिक शिक्षकांना (Primary teachers) दिलेले आदेश रद्द केले. परंतू सन 2021-22 पासून यापूर्वी दिलेल्या बीएलओचे प्रशासकीय कारणास्तव आदेश रद्द करून त्या ठिकाणी जुलै 2022 मध्ये प्राथमिक शिक्षक (teachers) व शिक्षिकांना आदेश दिले आहेत. दोन वर्षापासून करोनामुळे (corona) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान (Educational loss of students) झालेले आहे. या शैक्षणिक वर्षापासून नियमीत शाळा सुरु झाल्या असून

शैक्षणिक नुकसान (Educational loss) भरून काढण्यासाठी शाळा स्तरावर सेतू अभ्यास, चाचण्या, अध्ययन स्तर निश्चिती, मागील इयत्तेचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे तसेच नियमीत वर्गाचे अध्यापन करणे, खानेसुमारी, विद्यार्थी दाखल करणे, शाळाबाह्य विद्यार्थी सर्व्हेक्षण (Student Survey), वाचन लेखन कार्यक्रम, शालेय मध्यान्न भोजन योजना,

ऑनलाईन (online) विविध शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करणे, वेळोवेळी येणारे विविध उपक्रम, आर्थिक व्यवहार अभिलेखे पूर्ण करणे, विविध शाळा स्तरावरील प्रोसेडींग, प्रशिक्षणे, विद्यार्थी आधारकार्ड अपडेट करणे, विद्यार्थी माहिती ऑनलाईन, विद्यार्थी बँक खाते उघडणे, वृक्षारोपण, विविध स्पर्धा, आरोग्य तपासणी, डिजीटल शाळा बनवणे, विविध दिन साजरे करणे, संकलीत मूल्यमापन प्रक्रिया अशा प्रकारची अनेक कामे शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त करावी लागतात.

बहुतांश शाळा या द्विशिक्षकी आहेत. काही ठिकाणी शिक्षक संख्या कमी आहे. शाळेची कामे करतांना शिक्षक जेरीस येतात. अतिरिक्त कामांमुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होते. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होत आहे. यास्तव शासनाने नेमून दिलेली निवडणुकीच्या दिवशीची कामे, जनगणना, आपत्ती व्यवस्थापन या कामांना शिक्षकांचा विरोध नाही मात्र उपरोक्त सर्व कामांच्या व्यापामुळे बीएलओचे काम स्वीकारू शकत नाही.

याबाबतचे आदेश रद्द करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शिक्षक समन्वय समितीचे विजय आहेर, नितीन आहेर, संजय आहेर, महाजन, सतीश आहेर, संजय गुंजाळ, प्रांजल भामरे, जनार्दन पगार, मनेश गवळी, नवनाथ जाधव, अनंत देवरे, रवींद्र रौंदळ, जयराम सोनवणे, रवींद्र दुसाने, विलास चव्हाण आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

शिक्षक भवन उभारावे

जि.प. शिक्षक प्रशिक्षण, मिटींग तसेच शिक्षक संघटना मिटींग घेण्यासाठी प्रशस्त हॉल नाही त्यासाठी माध्यमिक शाळा, पब्लिक स्कूल व इतर ठिकाणी व्यवस्था करावी लागते. त्यामुळे जि.प. शाळा आवारात सुसज्ज शिक्षक भवन इमारत मंजूर करण्यात यावी. देवळा तालुका निर्मितीनंतर शिक्षण विभागात आस्थापनांचे कोणतेही पद मंजूर नाही. कार्यालयीन काम करण्यासाठी पं.स. आस्थापनेतील कर्मचारी दिले जातात. यास्तव सदर पद मंजूर करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com