नाशिक। प्रतिनिधी Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराच्यावतीने शहराध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे यांच्या संयोजनातून ज्ञानदायिनी गौरव पुरस्कार देण्यात झाला.

करोनासारख्या महाभयंकर रोगाचे संकट असतांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,म्हणून ऑनलाईन पद्धतीने किंवा प्रसंगी शाळेत जाऊन विद्यादानाचे काम केले, अशा नाशिक शहरातील काही महिला शिक्षकांचा सत्कार ज्ञानदायिनी गौरव सन्मान पत्र, शाल, श्रीफळ व फुले देऊन करण्यात आला.

ज्ञानदायिनी गौरव सन्मान पत्र पुरस्कार देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष निरीक्षक, प्रदेश सरचिटणीस रंजना देशमुख, महिला प्रदेश सरचिटणीस अश्विनी मोगल, नगरसेविका समिना मेमन उपस्थित होत्या. यावेळी खा.शरद पवार यांच्या महिला धोरण, स्थानिक स्वराज्य संस्था मधील महिलांना दिलेले पन्नास टक्के आरक्षण या गोष्टींचा उल्लेख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून मांडला.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ज्ञानदायिनी गौरव सन्मान पत्र पुरस्कार नंदा पेटकर प्राचार्य रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडीयम स्कूल, सरिता देशपांडे प्राचार्य एम.एस. कोठारी अकॅडमी नाशिक, मनिषा पाटील शिक्षिका महानगरपालिका शाळा क्रं ८, अनिता बेडसे शिक्षिका सरस्वती विद्यालय, उषा पवार योगा शिक्षिका रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडीयम स्कूल, डाॅ. वर्षा देशमुख हिंदी शिक्षिका रविंद्र विद्यालय नाशिक,

परिघा पाटोळे मुख्याध्यापिका महानगर पालिका शाळा क्रं ६०, तबस्सुम आझाद संचालिका लिटील फ्रेंडस् प्री स्कूल, सुनिता ताजनपुरे प्राध्यापिका जीनियस किड्स अकॅडमी, सुप्रिया कानडे प्राध्यापिका एम इ टी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, साधना गवारे शिक्षिका महानगरपालिका, वृषाली जायभावे, उपशिक्षिका बी.व्ही. जोशी महाराष्ट्र हायस्कूल, वंदना ठाकूर, वंदना ठाकूर प्राध्यापिका बी. व्ही जोशी महाराष्ट्र हायस्कूल उपनगर नाशिक या महिला शिक्षिकांनी स्विकारला. यावेळी सर्व उपस्थित पुरस्कार प्राप्त महिलांनी खा.पवार यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशा सदिच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस मध्य विधानसभा अध्यक्ष रंजना गांगुर्डे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष पुष्पलता राठोड, युवती अध्यक्ष किशोरी खैरणार, पश्चिम विभागीय अध्यक्ष संगिता गांगुर्डे, नाशिकरोड विभागीय अध्यक्ष रूपाली पठारे, शाकेरा शेख, पंचवटी विभागीय अध्यक्ष सरिता पगारे, शहर महिला पदाधिकारी वैशाली ठाकरे, अर्चना कोथमिरे, सुरेखा पठाडे, स्वाती बिडला, ऐश्वर्या गायकवाड, अर्चना श्रीवास्तव, संगिता पाटील, संगिता भामरे, दिक्षा दोंदे, मनिषा पवार यासह अनेक महिला उपस्थित होत्या.सुत्रसंचालन कल्याणी कदम यांनी केले.