शिक्षकदिनी शिक्षकांचा गौरव

शिक्षकदिनी शिक्षकांचा गौरव

देवळाली कॅम्प । वर्ताहर Nashik

देवळाली (Deolali) रोटरी व इनरव्हील क्लब (Rotary and Inner Wheel Club) कडून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब देवळालीने (Rotary Club Deolali) मागील चाळीस वर्षांची आपली परंपरा चालू ठेवीत डॉ. गुजर सुभाष (Dr. Subhash Gujar) शाळेत आयोजित कार्यक्रमत केंद्रीय विद्यालयाच्या उपप्राचार्या अंजु कृष्णानी या प्रमुख अतिथी होत्या....

शिक्षण (Education) हे साध्या भाषेत व व्यवसायिक (Business) दृष्टीकोन ठेवून विद्यार्थ्यांना मिळायला हवे असे त्यांनी सांगितले रोटरी अध्यक्षा नंदिनी कारिया यांनी उपस्थितांचे स्वागत केले व शिक्षण हे केवळ परीक्षा व मार्क पुरतेच मर्यादित न ठेवता, आयुष्य कसे जगावे ह्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे सांगितले.

रोटरी क्लब देवळाली हे फिल्टर पासून शाळेच्या फी, पुस्तक, मोबाईल आदी देणगी स्वरूपात विद्यार्थ्यांना वाटप करीत आहे व यापुढे ही सेवा अविरत चालू राहील अशी ही त्यांनी ग्वाही दिली. इनरव्हील अध्यक्षा संध्या सुंदररामन ह्यांनी अतिथीची ओळख करून दिली , सूत्र संचालन डॉ. अरुण स्वादी (Dr Arun Swadi) व मोहनदास कामत (Mohandas Kamat) यांनी तर आभार ब्रिगे. अनिल गर्ग (Brigadier Anil Garg) यांनी केले.

या प्रसंगी शिक्षक रिदम शाह, अश्विनी वैद्य, डोली धनांनी, राजन मेहता, लेतीफुनिस्सा खान, सविता बोठे, संदया देशपांडे व योगिता सूर्यवंशी आदींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास हितेश कारिया, अश्विनी व कर्नल अशोक शिरगावकर, शिला कामत, शैलजा गर्ग, कर्नल रोनी वानिया, कर्नल मलिक, रतन चावला, डॉ. अलका स्वादी, जयराम सुंदररामन, सुव्रता साठे, सुनीता व अशोक आडके आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com