'या' दिवशी होणार 'शिक्षक दरबार'

'या' दिवशी होणार 'शिक्षक दरबार'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यातील (nashik district) मुख्याध्यापक (Principal), शिक्षक- शिक्षकेतर (Teachers - Non-Teachers) यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी

शिक्षक आमदार किशोर दराडे (MLA Kishore Darade) यांनी शुक्रवारी (दि.२४) सकाळी ११ वाजता शिक्षक दरबाराचे आयोजन सीएमसीएस कॉलेज आकाशवाणी केंद्राजवळ गंगापूर रोड, नाशिक येठे आयोजन केले आहे.

यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर (Teachers - Non-Teachers) बांधवांनी आपले प्रश्न घेऊन उपस्थित रहावे. नाशिक जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर संघटना सहभागी असून सर्व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केले आहे. शिक्षक दरबारामध्ये पुढील विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. नाशिक विभागातील प्रयोगशाळा सहाय्यकांना (laboratory assistants) इतर विभागाप्रमाणे वेतन श्रेणी (Pay Scale) लागू करण्यात यावी.

शिक्षणाधिकारी कार्यालयातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (Teaching and non-teaching staff) मान्यता लवकरात लवकर देण्यात याव्या. शिक्षण (education) सेवकांना नियमित वेतनश्रेणीतील मान्यता देण्यात याव्या, तसेच एटीडी टू एएम वेतनश्रेणी आणि डीएड ते बीएड वेतन श्रेणी मान्यता लवकरात लवकर देण्यात याव्या. प्रलंबित संच मान्यता तसेच दुरुस्तीसाठी दिलेल्या संच मान्यता लवकरात लवकर मंजुर करून देण्यात याव्या.

सर्व प्रकारचे शालार्थ आयडी लवकरात लवकर देण्यात यावे.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्व देयके लवकरात लवकर मंजूर करण्यात यावी. विविध कारणांनी शिक्षकांचे प्रलंबित असलेले नियमित वेतन बीले मंजूर करण्यात यावी. सन 2019- 20 या वर्षापासून प्रलंबित असणारे फरक बिले, मेडिकल बिले, व इतर सर्व प्रकारची देयके मोर्चा अखेर मंजूर करण्यात यावी.

यावेळी शिक्षण उपसंचालक बी.बी.चव्हाण,शिक्षणाधिकारी माध्यमिक - प्रवीण पाटील, वेतन पथक अधीक्षक उदय देवरे, लेखाधिकारी- खडसे, माध्यमिक शिक्षणधिकारी कार्यालयातील अधीक्षक- सुधीर पगार, यांच्यासह शिक्षण खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com