डॉ.काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

डॉ.काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन (Former President Dr. Sarvapalli Radhakrishnan) यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन’ ( Teachers Day )म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरु,शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

शाळेचे संचालक .संजय गुंजाळ, मुख्यध्यापिका मनिषा साठे,पालक शिक्षक समितीचे सचिव अंकिता कोकणे, उपसचिव संदिप पदर, पालक शिक्षक समितीचे सदस्य संध्या सावंत, अलका अलहाते, नितीन सोनवणे, संपत शिरसाठ, राजेशकुमार शाह आदि मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोचे पूजन केले.

पालक शिक्षक समितीचे सदस्य राजेशकुमार शाह यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शिक्षकांचे स्थान,महत्व पटवून दिले. शाळेचे संचालक संजय गुंजाळ सर यांनी पालक शिक्षक समितीचे सदस्यांना व पालक शिक्षक समितीचे सदस्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना फूल आणि भेट वस्तू देऊन सन्मानित केले.

यानिमित्ताने शाळेत इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकां विषयी चे आपले मनोगत व्यक्त केले, व इ १ली ते ६ वी च्या वर्गावर अध्यापनाचा अनुभव घेतला. सर्व मुलांनी या उपक्रमात उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वरा भावसार व श्रेया सोनवणे यांनी केले व उत्कर्ष व्यव्हारे याने आभार प्रदर्शन केले .

शाळेचे संचालक संजय गुंजाळ, मुख्यध्यापिका मनिषा साठे,पालक शिक्षक समितीचे सदस्य,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com