थोरात विद्यालयात शिक्षक दिन

थोरात विद्यालयात शिक्षक दिन

जानोरी । वार्ताहर

मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात (Karmavir Raosaheb Thorat) व ज्युनिअर कॉलेज मोहाडी (Mohadi) विद्यालयात भारताचे पहिले उपराष्ट्रपती, थोर शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvapalli Radhakrushna) यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (Teachers Day) म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी (Shahaji Somvanshi) होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश कळमकर, विलास पाटील, सुदाम पाटील, सुधाभाऊ सोमवंशी, प्राचार्य श्रीराम खुर्दळ, पर्यवेक्षक सुभाष पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी कावेरी पिंगळे, वैष्णवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी संगीत शिक्षक दिलीप पागेरे व विद्यालयाच्या गीत मंचने गुरूने दिला.

ज्ञानरूपी वसा ख्र हे गुरूंच्या प्रती आदर व्यक्त करणारे गीत सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने ईश्वरी शेंद्रे,ज्ञानेश्वरी कदम, स्नेहा जाधव, तनुजा गायकवाड, अथर्व बोरस्ते, वैष्णवी पाटील,कावेरी पिंगळ व ज्येष्ठ शिक्षक निवृत्ती आहेर, यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.

पर्यवेक्षक सुभाष पाटील व प्राचार्य श्रीराम खुर्दळ यांनी आपल्या भाषणातुन शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. शहाजी सोमवंशी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन चरित्र, शिक्षण क्षेत्रातील योगदान, उपराष्ट्रपती म्हणून केलेले काम यांचा उल्लेख केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आकांक्षा भवर व स्नेहल घोलप यांनी केले व आभार सानिया पठाण हिने मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com