शेतीच्या बांधावर शिक्षकदिन

शेतीच्या बांधावर शिक्षकदिन

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी (Dindori) येथील श्री ईशान्येश्वर विद्यानिकेतन व ज्युपीटर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या (Jupiter English Medium School) विद्यार्थ्यांनी शेतीच्या बांधावर शिक्षक दिन (Teachers Day) साजरा केला.

विद्यार्थ्यानी ऑनलाईन (Online) व्हिडीओे (Video) करुन शिकवले. यावेळी दिंगबर भेरे या विद्यार्थ्याने श्री ईशान्येश्वर विद्यानिकेतनचे प्राचार्य पद सांभाळले तर वैष्णवी जाधव हिने ज्युपीटर इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य पद सांभाळले.

शेतीच्या बांधावर असलेल्या झाडाखाली फळा (Balck Board) लावण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना (Students) ऑनलाईन विषयांवार मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ऋचिका गायकवाड हिनेही ऑनलाईन मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ नेते सुधाकर चारोस्कर, शांताराम जाधव, श्रीराम जाधव, सिताराम जाधव, पोपट चौघुले, पंडीत जाधव, भय्या जाधव यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांंच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुसंस्कारीत होवून दिंडोरी शहराचे नाव उज्वल करावे, असे आवाहन सुधाकर चारोस्कर यांनी केले. यावेळी विद्यार्थी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास निलेश खरे, दिपाली पागे, शितल पाटील, अजित पगारे, गायत्री बोके, विद्या शार्दुल यांनी मार्गदर्शन केले. करोनामुळे (Corona) शाळा (School) जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा प्रवाह सोडू नये, असे आवाहन शांताराम जाधव यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com