शिक्षक व विद्यर्थ्यांनी मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हावे

शिक्षण उपसंचालक उपासनी
शिक्षक व  विद्यर्थ्यांनी मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हावे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

साहित्य आणि शिक्षक Literature and teachers यांचा फार जवळचा संबंध असून शिक्षक फक्त साहित्याचे अध्यापन करत नाही तर मातृभाषेचे संवर्धन करीत असतात. साहित्य संमेलन हा विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्वाचा बिंदू असून शिक्षक व विद्यार्थ्यानी नाशिक येथे होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 94th All India Marathi Literay Convention मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी Deputy Director of Education Nitin Upasani यांनी महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेत व्यक्त केले.

यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना उपासनी म्हणाले की, ग्रंथ दिंडी हा साहित्य संमेलनातील महत्वाचा टप्पा असून ही दिंडी यशस्वी करण्यासाठी संमेलनाच्या संयोजकांबरोबरच संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शुक्रवार दि.3 डिसेंबर 2021 ला निघणा्र्‍या साहित्य दिंडीत सहभागी होऊ या. नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. त्यात समाजातील सर्वांचाच सहभाग महत्वाचा आहे.

यावेळी संमेलनाचे कार्यवाह प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे यांनी शिक्षण आणि साहित्य, साहित्य संमेलन आणि शैक्षणिक संस्था यांचे अनुबंध स्पष्ट करुन संमेलनात शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे निमंत्रण शिक्षकांना दिले.

यावेळी शिक्षणाधिकारी श्रीमती धनगर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. कार्यक्रमाची रुपरेषा बालकुमार मेळाव्याचे संतोष हुदलीकर, संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर, ग्रंथदिंडीचे प्रमुख विनायक रानडे, एमईटीचे समन्वयक संभाजी पाटील यांनी स्पष्ट केली. या कार्यक्रमास महानगर क्षेत्रातील 350 मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला.सूत्रसंचालन गीता बागुल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश बिरारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com