शिक्षकाचा अपघाती मृत्यू

शिक्षकाचा अपघाती मृत्यू

येवला | प्रतिनिधी | Yeola

येथील माऊली लॉन्ससमोरच्या भागात मोटरसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात समता प्रतिष्ठान येवला संचलित नवरचना प्राथमिक विद्यालयातील उपशिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पांडुरंग चव्हाण (रा. पद्मकुंजनगर, येवला) असे त्यांचे नाव आहे. त्यांची मोटरसायकल स्लिप झाल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती येवला शहर पोलिसांना कळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शहानवाज शेख, पोलीस शिपाई तौशिफ शेख आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी येवला उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com