चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; शिक्षकाच्या मृत्यूने हळहळ

चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; शिक्षकाच्या मृत्यूने हळहळ
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक | Nashik

कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) कनाशी (Kanashi) येथील सिद्धिविनायक विद्यालयाचे मुख्याध्यापक कुणाल नंदकिशोर रौंदळ (वय २८) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली...

कनाशी जवळील भेंडी फाट्याजवळ ही घटना घडली. त्यांच्या घराजवळ वडील नंदकिशोर रौंदळ हे सायंकाळी जनावरांना पाणी पाजत असताना त्यांच्या मदतीसाठी कुणाल पुढे आले. बैलजोडी सोडून विहिरीजवळून नेत असताना बैलाला घाबरून ते मागे सरकले.

मात्र मागे असलेल्या विहिरीत ते पडले. त्यांना पोहता येत होते. परंतु पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कळवण उपजिल्हा रुग्णालयात (Kalwan Sub district Hospital) शवविच्छेदन करुन रविवारी रात्री साडे अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुणाल यांचे चार महिन्यापूर्वीचे विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, बहिणी, आजी, आजोबा असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com