टॅक्स प्रॅक्टिशनस असोसिएशनचा 'इतके' दिवस न्यायिक कामकाजापासून अलिप्त

टॅक्स प्रॅक्टिशनस असोसिएशनचा 'इतके' दिवस न्यायिक कामकाजापासून अलिप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

टॅक्स प्रॅक्टिशनस असोसिएशन (Tax Practitioners Association) नाशिक विभागातर्फे सहधर्व धर्मदाय आयुक्तांना निवेदन (memorandum) देत तीन दिवसासाठी (9 ते 11 जानेवारी) न्यायिक कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घतल्याने अनेक अशिलांना आपले काम करणे कठीण झाले आहे.

मुंबई (mumbai) मुख्यलयामार्फत ऑनलाईन (online) पद्धतीने कामकाज चालवण्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. त्यानुसार नाशिक (nashik) येथील कार्यालयीन कर्मचारी ऑफलाइन पध्दतीत कोणतेच प्रकरण दाखल करून घेत नसल्याने अडचणी होत असल्याचे विधीतज्ज्ञ व पक्षकार (Legal experts and parties) यांना तोंडी तक्रारी वकील संघाकडे केल्या होत्या. प्रत्यक्षात ऑनलाइन कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याने त्या आधी सोडवाव्यात आणि मग ही प्रक्रिया राबवावी अशी मागणी टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशन (Tax Practice Association) केली आहे.

प्रत्यक्षात मागिल पंधरा दिवसांपासून धर्मदाय कार्यालयाची (Charitable Offices) वेबसाईट (website), संकेतस्थळ अनेक वेळा बंद होत असते. मागील चार वर्षात संस्थांना आयडी व पासवर्ड (ID and password) मेलवर मिळालेले नाहीत. ऑनलाईन प्रणाली ही अर्धवट अपूर्ण व दोषपूर्ण आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही साईटमध्ये लॉग इन होत नाही. बरोबर कॅपचा कोड टाकून देखील चुकीचे नमुद होत असल्याचे दाखवले जाते.

ऑडिट रिपोर्ट (Audit report) दाखल केल्यानंतर अनेक त्रुटी निघतात जेव्हाही व्यवस्थेत ऑनलाइन दाखल करून पावती घेतलेली असते तेव्हा अनेक त्रुटी काढून ते दाखल ऑडिट रद्द होते त्यामुळे पक्षकारांना हेलपाटे मारावी लागतात. ऑनलाइन प्रकरण केल्यानंतर ही पुन्हा पक्षकार विश्वस्त तसेच वकिलांना हजर राहून पूर्तता करण्यास सांगितले जाते.

त्यामुळे तंत्रशुद्ध व दोषरहित प्रणाली कार्यवाहीन्वित करून त्याची एक वेळ प्रशिक्षण आयोजित करावे त्यानंतर ऑनलाईनचा आग्रह धरावा अशी मागणी वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसह संघटनेने दि.9 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान न्यायिक कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयीन प्रकरणाला सहभाग न घेण्याची ठरवली आहे त्यामुळे पक्षकारांची मोठी अडचण निर्माण झाली आहे

पक्षकारांना ऑनलाइन प्रणालीचा त्रास होऊ नये यासाठी ही प्रणाली व्यवस्थित करावी संकेत संकेतस्थळ अद्यावत करावं ते होत नाही तोपर्यंत ऑफलाईन प्रक्रिया सूरू ठेवावी. यंत्रणा परिपूर्ण झाल्यानंतरच ऑनलाइन सक्तीचा निर्णय त्यानंतर घ्यावा.

- भाऊसाहेब गंभीरे सरचिटणीस

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com