दै. देशदूत वृत्ताची दखल: ग्रामपंचायतीने लावले कर वसूली फलक

दै. देशदूत वृत्ताची दखल: ग्रामपंचायतीने लावले कर वसूली फलक

लासलगाव। वार्ताहर | Lasalgaon

लासलगावातील (lasalgaon) भरणार्‍या आठवडे व दैनिक बाजारातील बसणार्‍या शेतकरी (farmers) बांधव, व्यापारी व छोट व्यवसायिक यांचेकडून ठेकेदारामार्फत अवाजवी फी वसुली (Fee recovery) थांबविणे बाबत लासलगाव शिवसेनेच्या (shiv sena) वतीने ग्रामपालिकेला निवेदन (memorandum) देत आंदोलनाचा (agitation) इशारा दिला होता.

परिणामी दै. देशदूतने (deshdoot) सदरच्या वृत्तास सविस्तर वाचा फोडली होती. या वृत्ताची तत्काळ दखल घेत ग्रामपालिकेने फी आकारणी बाबत ठिकठिकाणी दरपत्रक (Rate sheet) लावले असून यामुळे आता ग्राहक व व्यवसायिकांची होणारी लूट थांबणार आहे. येथील आठवडे व दैनिक बाजाराची कर वसुली करणार्‍या ठेकेदारांकडून व्यवसायिक व ग्राहकांची लूट केली जात होती.

मन मानेल तशी रक्कम आकारली जात असल्याने ग्राहक व व्यवसायिकांमध्ये (Customers and professionals) नाराजी होती. या सर्व प्रकाराकडे ग्रामपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप, बाळासाहेब जगताप, प्रमोद पाटील, विकास रायते, केशव जाधव, राकेश रायते, फौजी शिंदे, बाळासाहेब शिरसाट, उत्तम वाघ, निरंजन शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. दै. देशदूतने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.

परिणामी याची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेवून दैनिक व आठवडे बाजार फी वसुली चे अधिकृत दरपत्रकाचे फलक लासलगाव बाजारतळ पाटोदा रोड, इदगाह मैदाना जवळ, पोलीस स्टेशन कार्यालयाजवळ, कॉलेजरोड, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आदी ठिकाणी लावले आहे. तसेच रविवारी बाजाराच्या दिवशी शेतकरी बांधव व व्यापार्‍यांच्या माहितीस्तव दवंडी देखील देण्यात येणार आहे.

तसेच ग्रामपंचायतीच्या अधिकृत शिक्क्यानिशी फी वसुलीची पावती 1 एप्रिल 2022 पासून चालु केली आहे. त्याची एक प्रत दत्परी ग्रामपंचायत मध्ये ठेवणार आहे. तसेच लासलगाव ग्रापंचायतीने दिलेल्या दरपत्रकाप्रमाणे शेतकरी बांधव व छोटे व्यवसायिकांनी पावती घेऊनच ठेकेदारास पैसे द्यावे. ठेकेदाराने अवाजवी फी वसुली केल्यास ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन ग्रामपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com