कॅन्सरग्रस्त रुग्णांना मिळणार 'एसएमबीटी'त उपचार; टाटा मेमोरियल सोबत करार

कॅन्सरग्रस्त रुग्णांना मिळणार 'एसएमबीटी'त उपचार; टाटा मेमोरियल सोबत करार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या एसएमबीटी हॉस्पिटलने (SMBT Hospital) मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या (Tata Memorial Hospital) सहाय्याने नाशिक येथील कॅम्पसमध्ये (Nashik Campus) सर्व सुविधायुक्त स्वतंत्र कॅन्सर सुविधा सुरु केली आहे. यामुळे मुंबई-पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत कॅन्सर रूग्णांना उपचारासाठी सोयीस्कर ठिकाण उपलब्ध होणार आहे...

कॅन्सर रुग्णांना अत्यंत माफक दरात उपचार मिळतील,असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

घामणगावमधील नंदी हिल्स येथे एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रांगणात टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्या सहकार्यातून एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचा शुभारंभ झाला. यावेळी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, उपसंचालक डॉ. पंकज चतुर्वेदी, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे आणि विश्वस्त डॉ. जयश्री थोरात आदी उपस्थित होते.

गरजू व सामान्यांसाठी स्वस्त व खात्रीशील उपचारांसाठी एसएमबीटी रुग्णालय नामांकित रुग्णालयांपैकी एक आहे. एसएमबीटी रुग्णालयाने उत्तर महाराष्ट्रातील अनेक गरजूंना अत्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवली असून अत्याधुनिक यंत्रणेसह उत्तम आरोग्य सुविधा हे एसएमबीटीचे वैशिष्ट्य राहिले आहे. यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधेकरिता उत्कृष्ट सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे.

एसएमबीटी हॉस्पिटलच्या डीन डॉ. मीनल मोहगांवकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डेप्युटी मेडीकल सुप्रिटेंडन्ट डॉ. संतोष पवार यांनी आभार मानले.

एसएमबीटी उभारणार स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल

एसएमबीटी वैद्यकीय संकुलात उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धर्मादाय रुग्णालय कार्यरत आहे. हृदय रुग्णांसाठी स्वतंत्र हार्ट इन्स्टिट्युट सुरू आहे.आता कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी याच परिसरात स्वतंत्र इमारतीत टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांच्या सहयोगातून स्वतंत्र अद्यावत व दर्जेदार कॅन्सर हॉस्पिटल उभारले जाणार आहे. सध्या येथे टाटा मेमोरियलच्या सहकार्याने केमोथेरपी व शस्त्रक्रिया विभाग सुरू केला असून येत्या दीड वर्षांमध्ये कॅन्सर हॉस्पिटलची स्वतंत्र अद्ययावत इमारत रुग्ण सेवेसाठी तयार होईल, असा विश्वास डॉ. हर्षल तांबे यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com