...म्हणून आता उद्योगक्षेत्रासाठी टास्क फोर्स

सीआआय समवेत मुख्यमंत्र्याच्या बैठकीत निर्णय
...म्हणून आता उद्योगक्षेत्रासाठी टास्क फोर्स

सातपूर | Satpur

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या (Corona Third Wave) पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठीही (State Industry Sector) कोव्हिडविषयक टास्क फोर्स (Covid Task Force) स्थापन करावा आणि मुख्यमंत्री सचिवालयामार्फत (Chief Minister's Secretariat) याचे नियंत्रण करावे, असे निर्देश सीआआय (CII Meeting) समवेतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) यांनी दिले. त्या धर्तीवर नाशिकमध्येही (Nashik) अधिकारी स्तरावर चाचपणी करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

करोनात उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार सुरू (Businesses resumed) राहिले हे उदाहरण महाराष्ट्राने देशाला घालून द्यावे. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा (Oxygen production, stocks) यांचे नियोजन करणेबाबत सीआयआय पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा (Discussion with CII officials) करण्यात आली.

यावेळी उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था करणे, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) उभारणे आदी मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रमुख उद्योजक उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com