उदिष्ट ३३०० कोटी; वाटप १ हजार २०९ कोटी
उदिष्ट ३३०० कोटी; वाटप १ हजार २०९ कोटी
नाशिक

उदिष्ट ३३०० कोटी; वाटप १ हजार २०९ कोटी

पीक कर्ज : कासवगतिने वाटप

Kundan Rajput

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

खरीप हंगाम सुरु होऊन दोन महिने लोटले असताना पीक कर्ज वाटपाचे पन्नास टक्के देखील उदिष्ट बॅकांनी गाठले नसल्याचे समोर येत आहे. यंदा ३ हजार ३०० कोटी पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आता पर्यंत १ हजार २०९ कोटींचे वाटप झाले आहे. राष्ट्रियकृत बॅका कर्ज वाटपात टाळाटाळ करत असल्याचे पहायला मिळत आहे.

करोना संकटामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत आला आहे. खरिप हंगामात पेरणीसाठी बि बियाणे खरेदी, खते आदींसाठी शेतकर्‍यांना पैशाची गरज होती. ते बघता बॅकांनी शेतकर्‍यांची अडवणूक न करता त्यांना कर्ज द्यावे असे आदेश शासनाने दिले होते. यंदाच्या खरिप हंगामात शेतकर्‍यांसाठी ३ हजार ३०० कोटिचा कर्ज वाटपाचा आराखडा तयार करण्यात आला. जिल्हाधिकारी दर बुधवारी बैठक घेऊन कर्ज वाटपाचा आढावा घेतात.

पीक कर्ज वाटपाची कासवगती लक्षात घेता वेग वाढावा असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी बॅकांना दिले होते. तरी देखील बॅका शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. खरीपाचे दोन महिने लोटले तरी फक्त एक हजार २०९ कोटींचे वाटप होऊ शकले. ३९ हजार शेतकर्‍यांनी पीक कर्जाचा लाभ घेतला आहे.

अद्याप हजारो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे. अद्याप ५० टक्के देखील कर्ज वाटप होऊ शकले नाहि. जिल्हा बॅक, पतसंस्था व सहकारी सोसायटया शेतकर्‍यांना पिक कर्ज सुलभरित्या वाटप करत आहे.

मात्र, राष्ट्रियकृत बॅका कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्‍या बॅकाना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

पीक कर्जाचे वाटप अधिक गतीने होण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी , तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली पीक कर्ज वाटपाबाबत आढावा बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. पुढील आठवड्यापर्यंत ३०० कोटी पर्यंतचे कर्ज जिल्ह्यात वाटप करावे अशा सूचना सर्व बँकर्सला देण्यात आल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com