
इगतपुरी | Igatpuri
नाशिक मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असलेला खाद्य तेलाचा टँकर (Edible Oil Tanker) कसारा घाटात (Kasara Ghat) अपघात घडल्याची घटना घडली आहे. कसारा घाटातील ब्रेक फेल पॉइंट जवळ उतरावर उलटल्याची घटना घडली होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली...
नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणारा टँकर क्रमांक जीजे १२ बीडब्ल्यू ८८१८ चे ब्रेक अचानक फेल झाल्याने टँकर चालकाचा टँकर वरील ताबा सुटल्याने हा टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला.
दरम्यान, रूट पेट्रोलिंग टीम आणि महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघात होताच टँकरमधून तेल गळती चालू झाली होती, मात्र पोलिसांनी ही तेल गळती रोखून सांडलेल्या तेलावर माती टाकल्यामुळे पुढील दुर्घटना टळली.
दरम्यान, पोलिसांच्या तत्परतेमुळे मुंबईला जाणाऱ्या वाहनांचे अपघात टळले व वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी कसारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.