टेबल टेनिस स्पर्धेत तनिशा कोटेचाला 'सुवर्ण'

टेबल टेनिस स्पर्धेत तनिशा कोटेचाला 'सुवर्ण'

नाशिक । प्रतिनिधी Nashik

इंदोर (Indor, MP) येथे सुरु असलेल्या यूटीटी सेंट्रल झोन (UTT Central Zone) राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस (National table tennis competition) स्पर्धेत यूथ 17 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकित तनिशा कोटेचा (Tanisha Kotecha) हीने अंतिम फेरीत महाराष्ट्राच्याच तिसर्‍या मानांकित पृथा वर्टीकर(Prutha Vartikar) हीचा 13-11, 7-11, 11-9, 11-6 व 11-6 असा 4-1 सहजरीत्या पराभव करीत सुवर्ण पदक पटकावले....

पहिला गेम 13-11 असा जिंकून तनिषाने 1-0 अशी आघाडी घेतली परंतु पृथा वर्टिकर हीने दूसरा गेम 7-11 असा जिंकून बरोबरी साधली परंतु पुढच्या तिन्ही गेम तनिषाने जिंकून सामना जिंकला. तनिषाला एकविस हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.

अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी उपउपांत्य फेरीत तिने या स्पर्धेतील प्रथम मानांकित हरीयाणाच्या सुहाना सैनी (Suhana Saini, Hariyana) हीचा 13-11, 7-11,11-5, 11-8 व 11-4 असा सहजरीत्या 4-1 असा पराभव करीत आपली सुवर्ण पदका कडची वाटचाल चालू ठेवली.

तर उपांत्य फेरीत चौथी महाराष्ट्राच्या जेनिफर वर्गीस (Jennifer Vergis) हीचा11-6, 11-6, 9-11, 11-5 व 12-10 असा 4-1 ने पराभव करीत अंतिम फेरीतले स्थान निश्चित करत सुवर्ण पदक पटकावले. तनिशा ही जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे.

तीच्या या यशाबद्दल जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, मिलिंद कचोले, अभिषेक छाजेड, पीयूष चोपडा, राजेश वाणी, हर्षल पवार, राज्य संघटनेचे यतिन टिपणीस, संजय कडू, रामलू पारे, योगेश देसाई, विवेक आळवणी, राम कोणकर, संजय मोडक, समीर भाटे यांनी अभिनंदन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com