नुकसान भरपाईचा तालुकानिहाय आराखडा मंजूर

 नुकसान भरपाईचा तालुकानिहाय आराखडा मंजूर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जून ते ऑगस्ट ( June To August Month ) या कालावधीत नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ( Heavy Rain ) झालेल्या नुकसानीच्या भरपाईची (compensation for damages) 11 कोटींची रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाल्यानंतर तालुक्यांना भरपाईची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या देखरेखीखाली नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीची रक्कम वाटप केली जाणार आहे. सर्वाधिक मदत ही बागलाण आणि मालेगाव तालुक्यात वितरित होणार आहेत.

नुकसानभरपाईसाठी असलेल्या नव्या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मदतीची रक्कम राज्य शासनाने जाहीर केलेली आहे. वाढीव दरानुसार शेतकर्‍यांना सुमारे 18 हजार 467 शेतकर्‍यांना 11 कोटी 24 लाखांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे कोरडवाहू क्षेत्र, बागायती क्षेत्र, बहुवार्षिक फळपिकांना फटका बसला, प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून राज्य शासनाला अहवाल पाठविला होता. त्यानुसार जिल्ह्याला 11 कोटी 24 लाखांचा निधी प्राप्त झाला असून निधी तालुक्यांना वर्ग करण्यात आले आहे.

शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजनुसार, नाशिक जिल्ह्यातील बाधित 18 हजार शेतकर्‍यांना 11 कोटी 24 लाखांची भरपाई मिळाली आहे. या निधीतून शेतीपिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांना मिळणार आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने सुमारे 14 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.

तालुकानिहाय अनुदान

नांदगाव-4,91,400/-

देवळा-4,14,560/-

बागलाण-1,46,58,780/-

कळवण-77,06,212/-

दिंडोरी-28,85,538/-

सुरगाणा-7,13,704/-

नाशिक-1,71,760/-

त्र्यंबक-10,880/-

निफाड-57,99,600/-

मालेगाव-7,96,32,564/-

एकूण- 11,24,84,998/-

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com