झूम बैठक
झूम बैठक
नाशिक

जिल्ह्याची तालुका निहाय गुणवत्ता कक्ष मिटींग संपन्न

झूम द्वारे मार्गदर्शन

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

कोविड-19 ह्या काळात शाळा सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमाद्वारे शिक्षण देण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत. शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाभरातील तालुक्यांच्या गुणवत्ता कक्षाची नुकतीच आढावा मिटींग घेण्यात आली. शिक्षणाधिकारी डॉ. वैशाती झनकर यांनी मार्गदर्शन केले.

नव्या शैक्षणिक वर्ष्यातील जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची तालुका गुणवत्ता कक्ष मिटींग झूम द्वारे घेण्यात आली. विविध माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण देण्याचे काम जिल्ह्यात चालू आहे. ह्या प्रमाणे विविध शैक्षणिक विषयांचा आढावा घेण्यात आला. शाळा बंद शिक्षण सुरु या उपक्रमात तालुका स्तरावर राबवित असलेते ऑफलाईन शिक्षणाच्या पद्धती, सर्व विध्यार्थ्यांना  शिक्षण देण्याचे नियोजन, डोनेट अ डिवाईस उपक्रमाचे नियोजनपर आढावा, तंत्रसेतू - नाशिक शिक्षण हेल्पलाईनच्या वापराबाबत आढावा घेण्यात आला.

जिल्हाभरातील तालुकानिहाय गटशिक्षणाधिकारी, डायट अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, उपक्रमशीत तंत्रस्नेही शिक्षक सहभागी झाले होते. जिल्हयातील शिक्षण विभागातीत २५० अधिकारी मिटींग सहभागी झाले होते..

लीडरशिप फॉर इक्वीटी संस्थेन ऑनलाईन गुणवत्ता कक्ष मिटींग घेण्याचे नियोजन केले होते. "शाळा बंद पण शिक्षण सुरू या अंतर्गत विद्यार्थी जिल्हयातील एकूण ३७ टक्के विद्यार्थी स्मार्ट फोन द्वारे शिक्षण घेत आहेत.

झूम, व्हाटस्प, दूरदर्शन वरील टिली मिली कार्यक्रम, रेडीओद्वारे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांकड़े शिक्षण घेण्यासाठी तांत्रिक साधन उपलब्ध नसल्यामुळे शिक्षक वाडी-वस्ती वर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.

साप्ताहिक स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना देणे आणि दर दोन दिवसांनी आढावा घेणे, घर तिथे शाळा मोठया वर्गातील विद्याच्यांचा मदतीने, विषय मित्र, गावातील शिक्षित सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, इतर सहकार्याच्या मदतीने प्रत्यक्ष गावात जाऊन विद्यार्थ्याना शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. या बाबींचा आढावा घेण्यात आला.

तालुका स्तरावरून डोनेट अ डिव्हाईस  द्या उपक्रमात दानशूर व्यक्तीना आवाहन करणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या मदतीन जनजागृती करणे असे आवाहन करण्यात आले.

कोविड - 19 काळात विध्यार्थ्यांना नियमित अभ्यास मिळण्यासाठी शिक्षण विभागाने नाशिक शिक्षण हेल्पलाईन हे टेलीग्रामद्वारे अप्लिकेशन तयार केले आहे.

या माध्यमातून विद्याध्यांना नियमितपणे अभ्यासमाला पाठविली जात आहे. या हेल्पलाईन वर आजपावेतो  ६००६  शिक्षक जाईन झालेले आहेत. तसेच २५२७  विद्यार्थी जाईन झालेते आहेत.

- डॉ.वैशाली वीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com