राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ ठाकरे गटात दाखल

कोकाटे गटाला जोर का झटका
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ ठाकरे गटात दाखल

सिन्नर । प्रतिनिधी sinnar

सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माघार घेण्याच्या आजच्या (दि.20) अंतिम दिवशी झालेल्या वेगवान घडामोडींमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी आमदार माणिकराव कोकाटे गटाला सोडचिठ्ठी देत थेट माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.

यावेळी बोलताना वाघ म्हणाले की, पोलीस म्हणून नोकरीला असताना राजीनामा देऊन 29-30 वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश करत थेट माणिकरावांच्या सोबत गेले. त्यावेळी संपूर्ण समाजाने स्व. तुकाराम दिघोळे यांचे नेतृत्व स्वीकारलेले असताना त्यांच्या विरोधात जाऊन कोकाटेंचे नेतृत्व मान्य केले. त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. ते ज्या पक्षात गेले त्या पक्षात त्यांच्यासोबत गेले, प्रामाणिकपणे त्यांचे काम करत त्यांना विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मात्र, श्रेय देण्याची वेळ आली तेव्हा कोकाटे यांनी विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना देण्याऐवजी त्यांच्या पत्नी, मुलीला दिले. तेव्हा सर्वांना वेदना झाल्या होत्या. शहा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्याते तालुक्याचा अध्यक्ष असतांना मला डावलण्यात आल्याचे वाघ म्हणाले. कोकाटेंकछून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे वाघ यांनी यावेळी म्हटले.आताही बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा अंतिम दिवस येऊनही एकदाही कोकाटेंकडून साधा फोन आला नसल्याचे वाघ यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

कुणाला उमेदवारी द्यायची याची साधी चर्चाही तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी केली नाही. असा अपमान सहन करत काम करायचे? त्यामुळे कोकाटेंना सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे वाघ यांनी यावेळी नमूद केले.

आगामी निवडणुकांत राजाभाऊंंच्या सोबत राहणार असल्याचे नमूद करताना वाघ म्हणाले की, बाजार समितीच्या निवडणुकीत विजय मिळवून विजयी उमेदवारांसह राजाभाऊंंना सोबत घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा अजून राजीनामा दिलेला नसल्याचे सांगत वाघ यांनी म्हटले की, आपण दोन-तीन दिवसात पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणार आहे.

आपला पक्षाच्या नेत्यांवर राग नसल्याचे सांगताना वाघ यांनी राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याकडून आपल्याला अशी अपमानास्पद वागणूक कधीच मिळाली नसल्याचे म्हटले. मात्र, कोकाटेंकडून वारंवार होणार्‍या अपमानाला कंटाळून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. प्रत्येक निवडणुकीला पक्ष बदलणार्‍या नेत्यांबरोबर आता राहायचे नाही हा निश्चय करूनच राजाभाऊंंचे नेतृत्व स्वीकारत असल्याचे वाघ यांनी पक्ष प्रवेश करताना स्पष्ट केले. राजाभाऊंनी जिल्हा परिषदेला उमेदवारी द्यावी म्हणून शिवसेनेत आलो नाही हे वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले.

खरेदी-विक्री संघाचा चेअरमन करताना कोकाटे यांनी आपल्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला. त्याची ऑडिओ क्लिप त्यांच्याजवळ असेल तर त्यांनी ती जाहीर करावे, असे आवाहन करत वाघ यांनी कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी आपण कष्ट घेतल्याचे नमूद केले. जिल्हा परिषदेतील मित्र हेमंत गोडसे यांना मैत्रीत खासदार करण्याचा शब्द दिला होता. कोकाटेंसोबत काँग्रेसमध्ये असतानाही शिवसेनेची उमेदवारी मिळालेल्या गोडसे यांच्या विजयासाठी केवळ मैत्रीखातर काम केले, असे वाघ यांनी सांगताना त्यावेळी भुजबळांच्या विरोधात काम करायला नको होते. त्या चुकीबद्दल खुप भोगले असल्याची वाघ यानी यावेळी व्यकत केले. राजाभाऊ व उदय सांगळे यांनी केलेली कामे गावोगावी दिसते, असे वाघ यावेळी म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com