तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार घोषित

'देशदूत'च्या अशोक निसाळ यांचा समावेश
तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार घोषित

देवळाली कॅम्प । प्रतिनिधी Deolali Camp

नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे ( Nashik Taluka Marathi Journalists Association) कार्यगौरव पुरस्कार (Karygaurav Puraskar )जाहीर करण्यात आले असून यात दै. देशदूतचे उपसंपादक अशोक निसाळ ( Ashok Nisal )यांचेसह प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया,कला, क्रीडा, कृषी, धार्मिक, शैक्षणिक, वृत्तपत्र विक्रेते, उद्योजक, सामाजिक संस्था अशा 38 जणांचा समावेश आहे.

येथील डॉ. गुजर सुभाष हायस्कूलमध्ये दि. 6 रोजी सकाळी 11 वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत पुरस्कारार्थींची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये अशोक निसाळ, उमेश परिपूर्ण, दिलीप सूर्यवंशी, दत्ता जाधव, विलास भालेराव, महेश गायकवाड, अशोक गवळी, प्रशांत निरंतर, श्रीधर गायधनी, जिजा दवंडे, राजेंद्र सूर्यवंशी, नीलेश अलई, करण बिडवे, चंद्रशेखर गोसावी, सुशील भागवत, गुलाब ताकाटे, कल्पेश लचके, जितेंद्र नरवडे, भैयासाहेब कटारे यांच्यासह निलेश हासे, सर्पमित्र विक्रम कडाळे, प्रा. संगीता पवार,

प्रशांत दाते, सुनील भिसे, कैलास भोर, संजय कल्याणी, शिवम तागड, अमोल गायधनी, संजय पेखळे, तन्वी लखवानी, शिवा महाराज आडके, बबनराव कांगणे, सुमित्रा पाटोळे, जगदंबा माता ट्रस्ट, शंकर एज्युकेशन सोसायटी, आदर्श सैनिक फाऊंडेशन, जनकल्याणी फाउंडेशन, आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ यांचा समावेश आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, अध्यक्ष सुधाकर गोडसे, सुनील पवार, अरुण बिडवे यांचेसह पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com