मुद्रांक घोटाळा प्रकरणी तलाठी, मंडल अधिकारी निलंबित

मुद्रांक घोटाळा प्रकरणी तलाठी, मंडल अधिकारी निलंबित
USER

मेशी । वार्ताहर

फेरफार नोंद घेण्यापासून ती मंजूर करेपर्यंत विविध टप्प्यांवर कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याचे स्पष्टपणे दिसून आल्याने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मेशी, ता. देवळा येथील तलाठी आर.बी. गुंजाळ व उमराणे येथील मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील यांना निलंबित केले आहे. या कारवाईने महसुल यंत्रणेत खळबळ उडाली असून या प्रकरणातील मुख्य सुत्रधार मुद्रांक विक्रेता गोटू वाघ अद्याप फरार आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयात मूळ दस्तावेज या फेरफार करून व त्याबाबतची सूचना क्रमांक , सोबत सादर केली आहेत, यामुळे दुसर्‍याच्या नावे जमीन खरेदी करण्यात आल्याने या बनावट खरेदी खतात मेशी तालुका देवळा येथील तलाठी आर बी गुंजाळ उमराणे येथील मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील हे सामील असल्याचे तक्रारी अर्जावरून दिसून आल्याने त्यांच्यावर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे.

या आदेशात बनावट दस्तावर दाखल करण्याची तारीख नसणे तसेच सुची क्र. 2 सादर नसतांनाही फेरफार नोंद करणे. संबंधितांना नोटीस, नमुना 9 ची प्रत न बजावणे, अर्जाच्या कालावधीतील नोंदी नसणे अशा विविध त्रुटी दिसून आल्याने संबंधितांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आले आहे. 2012 मध्ये नोंदवलेल्या दस्ताच्या केवळ प्रमाणित प्रतीवरून फेरफार नोंद घेतांना तलाठ्यांनी संबंधित व्यवहाराची सत्यतेची पडताळणी करणे गरजेचे असते. तर मंडल अधिकार्‍याने कागदपत्रांची पुरेशी शहनिशा न करता अती घाई करणे, नमूना नोटीसीत खाडाखोड असणे, महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमाचे व त्या संबंधातील इतर तरतुदींच्या नोंद वह्या नियम 1971 मधील तरतुदींचे फेरफार प्रमाणित करणारे अधिकार म्हणून पालन केल्याचे दिसून आलेले नाही.

तलाठी व मंडल अधिकारी या दोघांनी त्यांच्या कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या गैरवर्तुणुकीबाबत त्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी अभिलेख व पुराव्यामध्ये हस्तक्षेप करू नये यासाठी त्यांना निलंबीत करण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात नमूद केले आहे. सदर आदेशाची प्रत प्रांत चांदवड, देवळा तहसीलदार यांना देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com