सात हजारांची लाच स्विकारताना तलाठी गजाआड
Anti Corruption Bureau

सात हजारांची लाच स्विकारताना तलाठी गजाआड

नाशिक | Nashik

बँकेकडून (Bank) मंजूर झालेल्या पिककर्जाच्या बोजाची सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्यासाठी तलाठ्याने सात हजारांची लाच स्वीकारल्याची घटना मालेगाव तालुक्यात घडली...

अनंता अशोक वायाळ असे या तलाठयाचे नाव आहे. मालेगाव तालुक्यातील (Malegoan Taluka) वनपट येथे ते कार्यरत आहेत.

वनपट येथील तक्रारदार शेतकऱ्याच्या पत्नीला कॅनरा बँकेकडून (Canara Bank) पीककर्ज मंजुर (Crop loan) झाले होते. सदर पीककर्जाच्या बोजाची सातबारा (Satbara) उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी वायाळ याने सात हजार रुपयांची मागणी केली.

यासंदर्भात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau) तक्रार करण्यात आली. विभागाचे पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलिस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, अजय गरुड आदींच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून सात हजार रुपये लाच स्विकारताना तलाठी वायाळ याला रंगेहाथ पकडण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com